Mlc Election 2023: सत्यजित तांबेंबद्दल भाजपच्या भूमिकेचा सस्पेन्स संपला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

bjp activist support to satyajeet tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल भाजपने (Bjp) मौन बाळगलं होतं. मात्र, अखेर सस्पेन्स संपला. भाजपनं जाहीरपणे पाठिंबा न देता कार्यकर्त्यांचा निर्णय सांगत पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील मतदान तांबेंच्या पेटीत पडणार हे स्पष्ट झालं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुरूवातीपासूनच नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. अगदी मतदानाच्या एक दिवस अगोदरपर्यंत हा सस्पेन्स भाजपनं कायम ठेवला. पक्षाकडून उमेदवार इच्छुक असतानाही भाजपनं नाशिक पदवीधर मतदारसंघातून कुणालाच उमेदवारी दिली नाही. त्यामुळे भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार हे सुरूवातीपासून बोललं जात होतं.

30 जानेवारी रोजी विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान होत असून, भाजपकडून कोणतीही भूमिका नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत जाहीर करण्यात आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबद्दल बोलताना म्हणाले होते की, ‘शिक्षक व पदवीधर मतदार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची घोषणा करतील.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील भाजपचे स्थानिक नेते काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अखेर भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा पक्षाचा निर्णय नसल्याचं सांगत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी भूमिपुत्राच्या पाठिशी उभं राहण्याची भूमिका यापूर्वीच मांडली होती. त्यानंतर त्यांनी रविवारीही (29 जानेवारी) हीच भूमिका मांडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजप आणि विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप द्वारे सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचं आवाहन सुरू केलं.

ADVERTISEMENT

त्यानंतर विखे पाटलांनी निर्णय झाला असल्याचं स्पष्ट केलं. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय पक्षाचा नाहीये, मात्र कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगत सावरासारव करण्याचाही प्रयत्न केला. असं असलं तरी भाजपचं मतदान आता सत्यजित तांबेंच्या पेटीत पडणार हे स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT