लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दुखवटा, उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या […]
ADVERTISEMENT
मुंबई: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.
ADVERTISEMENT
या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चा अधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज (6 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं. मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातील एका युगाचा अस्त आज झाला अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तसंच राजकीय क्षेत्र, संगीत क्षेत्र आणि कलाक्षेत्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे.
हे वाचलं का?
लता मंगेशकर यांना मागील 28 दिवसांपासून ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाला होता. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
मी फक्त लता मंगेशकरांना ओळखतो…जेव्हा सुनील गावसकर पाकिस्तानात जाऊन अपमानाचा बदला घेतात
ADVERTISEMENT
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
ADVERTISEMENT
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था करण्यात आली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर व आईचे नाव शेवंताबाई होतं. दीनानाथ मंगेशकर स्वतः शास्त्रीय गायक होते. त्यामुळे लता मंगेशकरांना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला.
लहान असतानाच लता मंगेशकर यांनी भावासोबत शास्त्रीय संगीत शिकायला सुरूवात केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून बहिणी आशा, उषा आणि मीना यांच्यासोबत संगीतसाधनेची सुरूवात केली होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत लता मंगेशकर यांनी सुरांची साधना कायम ठेवली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT