Navneet Rana, Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांनी जामीन न घेण्याची भूमिका का बदलली?
हनुमान चालीसा पठण प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांना वांद्रे येथील सुट्टीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने ६ मे पर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने सुरुवातीलाच जामिनासाठी अर्ज करणार नसल्याची भूमिका घेतली होती, मात्र आज भूमिका बदल जामीन अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT
हनुमान चालीसा पठण प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांना वांद्रे येथील सुट्टीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने ६ मे पर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने सुरुवातीलाच जामिनासाठी अर्ज करणार नसल्याची भूमिका घेतली होती, मात्र आज भूमिका बदल जामीन अर्ज दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांनी म्हटलं होतं. त्यासाठी ते शुक्रवारी मुंबईत आले. मात्र, शिवसैनिकांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करता आलं नाही. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ अ खाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली.
Navneet Rana Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात काय घडलं?
हे वाचलं का?
या अटकेनंतर त्यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्याला आज सकाळी खार पोलिसांनी वांद्रे येथील सु्ट्टी कालीन न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी रिझवान मर्चंट यांनी नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर प्रदीप घरत यांनी सरकारच्या बाजू मांडली.
यावेळी झालेल्या सुनावणी वेळी सरकारी वकिलांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने मागणी फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
ADVERTISEMENT
किरीट सोमय्या हल्ला : सरकारबरोबर पोलिसांनाही आमची ताकद दाखवून देऊ; फडणवीस संतापले
ADVERTISEMENT
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा
दरम्यान, भादंवि १५३ अ (दोन समाजात वा गटात तेढ निर्माण केल्याप्रकरणी) आणि ३५३ (सरकारी कामात अडथळा) नुसार गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर आज त्यांच्या विरुद्ध कलम १२४अ (राजद्रोह) नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरून आव्हान दिलं गेलं. त्याचबरोबर सरकारला आव्हान दिलं गेलं. त्यांना १४९ ची नोटीस देण्यात आली होती. शांतता ठेवणं कर्तव्य असून, परत जाण्यास सांगितलं होतं. परंतू सदरील नोटीस न मानता त्यांनी शासनालाच आव्हान दिलं. त्याच्यामुळे त्यांच्यावर कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाच्या घरी जाण्यासाठी परवानगी आवश्यक असते, पण त्यांनी परवानगी न घेता आव्हान दिलं,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राणा दाम्पत्याने जामीन न घेण्याची भूमिका का बदलली?
नवनीत राणा आणि रवि राणा यांनी अटक झाल्यानंतर जामीनासाठी अर्ज करणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर दोघांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. याबद्दल राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
“आधी १३५ अ अंतर्गत नवनीत राणा, रवि राणा यांच्या विरुद्ध रात्री साडेसहा वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रात्री ९.३० वाजता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकिलांनी १२४ अ चा युक्तीवाद केला. त्याचा एफआयआरमध्ये कुठेही उल्लेख नाही. असं तर नाही ना की, रात्रीतून त्यांच्या मनात आलं की त्यांना १२४ अ लावता येतं. १२४ अ हे सांगण्यासाठी पुरावे लागली. त्यांना बाहेर उभं राहून हनुमान चालीसा पठण करायची होती. हनुमान चालीसा म्हणणं ती सरकार विरुद्ध नाही. त्यातून रामाची स्तुतीच आहे.”
‘उद्धव ठाकरे XXX, त्यांची सेना XXX’, रवि राणांकडून मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ
“हनुमान चालीसा पठण करणं जर १२४ अ किंवा १५३ अ कलमातंर्गत येत असेल, तर सर्व मंदिरांना टाळे लागले पाहिजेत. प्रार्थना म्हणण्यावर बंदी यायला पाहिजे. हे असंवैधानिक आहे. अशा स्वरुपाचं प्रकरण पहिल्यांदाच बघत आहोत. आम्ही जामीन अर्ज दाखल केला आहे. सरकारी पक्षाला २७ तारखेला उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्यानंतर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे,” असं रिझवान मर्चंट माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“…म्हणून आम्ही जामीनासाठी अर्ज केला”
“आम्ही जामीन घेणार नव्हतो. कारण आमच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दोन्ही बाजू समान न्यायाने हाताळत आहेत. आम्हाला वाटलं की, पोलीस निष्पक्षपणे आहेत. पण, जेव्हा आणि ती एफआयआर वाचली, तेव्हा त्यात आम्हाला दिसलं की, ज्या चार व्यक्तींविरुद्ध तक्रार दिलेली होती. त्यांचा उल्लेखही नव्हता. तक्रारीतील कलम ३०७ चा उल्लेखही नव्हता. पुर्ण प्रकरण बदललं गेलं. आम्हाला हेही कळलं की, एफआयआर दिलेल्या तक्रारीच्या आधारावर तयार करण्यात आलेलं नाही. पोलिसांनी स्वतःच्या मर्जीने एफआयआर दाखल केला. न्यायालयाने पोलीस कोठडीची गरज नसल्याचं सांगत न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली,” असं राणा यांच्या वकिलांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT