Nawab Malik: ‘भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली’, नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे गेल्या महिन्याभरापासून साधारण दररोज नवनवे आरोप करुन भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर अॅक्शनमध्ये आलेले नवाब मलिक हे अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीएत. आज (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजपच्या एका माजी मंत्र्यावर मंदिराची हजारो एकर […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे गेल्या महिन्याभरापासून साधारण दररोज नवनवे आरोप करुन भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर अॅक्शनमध्ये आलेले नवाब मलिक हे अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीएत. आज (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी भाजपच्या एका माजी मंत्र्यावर मंदिराची हजारो एकर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. (BJP Former Minister Temple Land Scam) लवकरच आपण या माजी मंत्र्यांचा भांडाफोड करु असं देखील मलिकांनी यावेळी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा नवाब मलिक नेमकं काय म्हणाले:
‘भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराची जमीन हडपली’
हे वाचलं का?
‘वक्फ बोर्डाता क्लीन अप ऑपरेशन सुरु झालं आहे. भाजपचे लोक म्हणतात नवाब मलिकांचा वक्फ बोर्डाचा घोटाळा बाहेर काढू. मी तर सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या मंदिर, मस्जिद, दर्गा यांच्या जमिनी हडपण्याचं काम या महाराष्ट्रात केलं आहे भाजपच्या एका माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडपली आहे. माझी तर इच्छा आहे की, ज्या जमिनी ईश्वराच्या, अल्लाच्या नावे देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशा जमिनी ज्यांनी लुटल्या आहेत त्या सगळ्यांना तुरुंगात टाकलं जावं.’ असं आव्हानच नवाब मलिकांनी यावेळी दिलं आहे.
‘आम्ही तर कारवाई सुरु केली आहे. ईडी देखील त्यात आम्हाला सहयोग करेल अशी मी अपेक्षा करतो. पण मंदिराची जमीन माजी मंत्र्यांने कशी हडपली, कसे शेकडो करोड रुपये खाल्ले त्याचा देखील भांडाफोड करु.’ असा गौप्यस्फोट मलिकांनी यावेळी केला आहे.
ADVERTISEMENT
एक अभिनेत्री मलाना क्रीमचा ओव्हरडोज झाल्यासारखं बोलतेय; मलिकांचं कंगनावर टीकास्त्र
ADVERTISEMENT
‘एक अधिकारी जर त्यांच्या बॉसमार्फत मला घाबरविण्याचा प्रयत्न करत असतील तर तसं होणार नाही. नवाब मलिक कोणालाही घाबरणार नाही. चोरोंन हे ललकारा, जवाब मिलेगा करारा.. त्यामुळे या धमक्यांना मी घाबरणार नाही. ही लढाई आम्ही चोरांविरुद्ध छेडली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ’ असंही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितलं आहे.
वक्फ बोर्ड ED: ‘मरणाला घाबरत नाही, तुरुंगात जायला घाबरत नाही..’ नवाब मलिकांचं थेट आव्हान
कंगना राणावतचा पद्मश्री परत घेण्याची मागणी
दरम्यान, याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी कंगना रणौतने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानावर टीका केली आहे. ‘भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं, असं वादग्रस्त विधान कंगनाने केलं होतं. 1857 पासून या देशात स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाल्यानंतर लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधींनी मोठा लढा उभारला. शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.’ असं मलिक यावेळी म्हणाले.
‘आज काही अभिनेत्री मलाला क्रीम घेऊन ओव्हरडोस झाल्यासारखं बोलत आहेत. तिला देण्यात आलेल्या पद्मश्री सन्मान तत्काळ मागे घेण्यात यावा’, अशी आम्ही मागणी करतो.
‘करोडो भारतीयांच्या भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला आहे. तात्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात यावी आणि पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने ताबडतोब परत घ्यावा’, अशी मागणी नवाब मलिकांकडून करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT