समीर वानखेडे दोघांच्या मदतीने लोकांचे फोन टॅप करताहेत; नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडे यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवायांबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला खरा असून, त्यावर आपण ठाम आहोत. हे जन्म प्रमाणपत्र खोटं असेल, तर माझं समीर वानखेडेंना आव्हान आहे. त्यांनी खरं प्रमाणपत्र लोकांसमोर आणावं’, असं आव्हान मलिक यांनी दिलं आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे हे लोकांचे कॉल कॉल इंटरसेप्ट करत असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला आहे.

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मलिक म्हणाले, ‘मी आज पुन्हा सांगतोय. मी माझ्या मतावर ठाम आहे. जे जन्म प्रमाणपत्र ट्वीट केलं आहे, ते खरं आहे. त्या प्रमाणपत्रावर दाऊद के. वानखेडे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. ते नीट बघितलं तर तारांकित करून फेरफार करण्याचं काम प्रमाणपत्रात केलं गेलेलं आहे. मुंबईत लोकांचे जन्मदाखले ऑनलाईन पद्धतीने मिळता येऊ शकतात. वानखेडे यांच्या बहिणीचं प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध आहे. पण, त्यांचा जन्मदाखला कितीही शोधला तरी ऑनलाईन मिळत नाही’, असं मलिक यांनी सांगितलं.

‘आम्ही रजिस्टर तपासायला लावले. गेल्या दीड महिन्यांपासून आम्ही हे प्रमाणपत्र शोधत होतो. तेव्हा स्कॅन करून संग्रहित ठेवलेलं हे प्रमाणपत्र आम्हाला मिळालं आहे. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. ज्ञानेश्वर वानखेडे जन्माने मागासवर्गीय आहेत. त्यांनी या प्रवर्गातून वाशिम जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळवलं होतं. त्या आधारावरच त्यांना नोकरी मिळाली. माझगावमधील घागरा इमारत म्हणून आहे. तिथे त्यांनी स्वर्गीय जायदा खान यांच्या निकाह केला आणि ते दाऊद खान झाले. पूर्ण कुटुंब मुस्लिम म्हणून आयुष्य जगलं आणि जगत आहे, हे सत्य आहे’, असं मलिक म्हणाले.

हे वाचलं का?

‘समीर वानखेडे यांनी वडिलांच्या जातप्रमाणपत्राचा आधार घेत स्वतःचं प्रमाणपत्र बनवलं, जे पूर्णपणे बोगस आहे. एका गरीब मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अधिकार यांनी हिरावून घेतला आहे. हे प्रकरण लवकरच जात पडताळणी समितीसमोर लवकरच जाईल आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल. असं सांगितलं जातंय की मी खोटं प्रमाणपत्र दाखवत आहे. जर हे खोटं असेल, तर खरं कोणतं आहे, हे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी वा त्यांनी स्वतः लोकांसमोर आणावं. कुणी कितीही सरकारी कागदपत्रं नष्ट करण्याचं प्रयत्न केले, तरी ते मिळतात’, असा इशारा मलिक यांनी समीर वानखेडे यांना दिला.

‘माझ्यावर जे प्रश्न विचारत आहेत, त्यांना मला विचारायचं आहे. माझ्या जावयाला तुरुंगात बंद करण्यात आलेलं आहे. माझी मुलगी अनेक गोष्टी चौकशी करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे की, तिचे सीडीआर उपलब्ध करून द्यावेत. निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर त्यांनी ही माहिती मागितली? मला वाटतंय की वानखेडे मर्यादा ओलांडत आहे. समीर वानखेडे दोन लोकांच्या मदतीने लोकांचे फोन टॅप करत आहेत. लोकांचे कॉल्स इंटरसेप्ट केलं जात आहे. दोन खासगी लोक आहेत. एक व्यक्ती मुंबईत आहे, तर एक व्यक्ती ठाण्यात आहे. समीर वानखेडे कशापद्धतीने लोकांचे फोन टॅप करत आहे, याचेसुद्धा पुरावे मी समोर आणणार आहे’, असं गौप्यस्फोट मलिक यांनी यावेळी बोलताना केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT