समीर वानखेडेंना खुर्चीवरून हटवण्यासाठी नवाब मलिक यांची गुंडागर्दी सुरू-क्रांती रेडकर
नवाब मलिक यांची गुंडागर्दी सुरू झाली आहे. आपल्याला ते करत असलेल्या आऱोपांवरून हेच दिसतं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते आणखी काहीही आरोप करू शकतात. त्यांचं काम तेच आहे. त्यांनी सांगितलं होतंच की ते समीर वानखेडेंना खुर्चीवरून हटवणार त्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडून नवे आरोप झाले तरी आश्चर्य वाटणार नाही असं म्हणत […]
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांची गुंडागर्दी सुरू झाली आहे. आपल्याला ते करत असलेल्या आऱोपांवरून हेच दिसतं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते आणखी काहीही आरोप करू शकतात. त्यांचं काम तेच आहे. त्यांनी सांगितलं होतंच की ते समीर वानखेडेंना खुर्चीवरून हटवणार त्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडून नवे आरोप झाले तरी आश्चर्य वाटणार नाही असं म्हणत क्रांती रेडकरने म्हणजेच समीर वानखेडे यांच्या पत्नीने नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले होते नवाब मलिक?
हे वाचलं का?
‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाणार आहे. तुझा तुरुंगावास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहते आहे. वानखेडेची बोगसगिरी जगासमोर आणणार. समीर वानखेडेचा बाप बोगस होता, हा पण बोगस आहे.. याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला याने तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या तुझ्या बापाचं नाव सांग. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंबाबत एकेरीवर येत टीका केली आहे.
यानंतरही नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोपांचं सत्र सुरूच ठेवलं आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत आरोप केले आहेत. त्यांचा निकाहनामा समोर आणला. तसंच त्यांच्या वडिलांचं नाव कसं दाऊद आहे ते समोर आणलं. सोमवारी तर त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला फोटोच पोस्ट केला आणि पहचान कौन असं कॅप्शन दिलं. नवाब मलिक यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच इतरही अनेक व्यक्तीगत आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारला. या प्रकरणात त्यांनी आठ जणांना अटक केली. यामध्ये सर्वात मोठं नाव आहे ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचं. आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा अशी बडी मंडळी या पार्टीत होती. या प्रकरणी या सगळ्यांना अटक कऱण्यात आली. ही कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन NCB ची सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचा आरोप केला. यानंतर NCB नेही पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. तरीही नवाब मलिक यांनी आरोप करणं सोडलेलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT