अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB चा छापा; २४ तासांत दुसरी मोठी कारवाई

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीने (NCB) अभिनेता अरमान कोहली यांच्या घरी छापा टाकला आहे. ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांतील एनसीबीची दुसरी मोठी कारवाई आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून एनसीबीकडून सातत्याने अंमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या जात आहे. या कारवायांमध्ये अनेक कलाकारांसह ड्रग्ज पुरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी एनसीबीने एका ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतलं होतं. या ड्रग्ज पेडलरची चौकशी केल्यानंतर एनसीबीने अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला.

ड्रग्ज पेडलरने एनसीबीला दिलेल्या माहितीनुसार या ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीचाही सहभाग असल्याची माहिती असून, शनिवारी दुपारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने अरमान कोहलीच्या जुहू येथील घरावर छापा टाकला. दुपारपासून कारवाई सुरू आहे. दरम्यान, अरमान कोहलीच्या घरात ड्रग्ज आढळून आल्याची माहिती असून, त्याची एनसीबी कार्यालयात चौकशी केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यापूर्वी २०१८मध्ये अरमान कोहली याला उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आलं होतं. त्याच्याजवळ तब्बल स्कॉच व्हिस्कीच्या ४१ बॉटल आढळून आल्या होत्या. कायद्यानुसार १२ बॉटल ठेवण्यास मुभा आहे. मात्र, अरमान कोहलीने ४१ बॉटल ठेवलेल्या होत्या. विशेष म्हणजे यातील बहुतांश व्हिस्कीच्या बॉटल या परदेशी ब्रॅण्डच्या होत्या.

या प्रकरणाबरोबरच गर्लफ्रेंड नीरु रंधावा हिला मारहाण केल्याप्रकरणीही अरमान कोहलीवर गु्न्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. एका आठवड्यानंतर त्याला लोणावळ्यात अटक करण्यात आली होती आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आली होती. त्यानंतर नीरु रंधावाने हा गुन्हा मागे घेतला होता.

ADVERTISEMENT

गौरव दीक्षितला अटक व कोठडी

ADVERTISEMENT

एनसीबीने शुक्रवारीच ड्रग्ज प्रकरणात छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव दीक्षित यांच्यावर कारवाई केली. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात गौरव दीक्षितला अटक केली. गौरवच्या घरात एमडी ड्रग्ज आणि चरस आढळून आलं होतं.

अभिनेता एजाज खान याची चौकशी केल्यानंतर एनसीबीने गौरव दीक्षितला अटक केली. त्याला शनिवारी NDPS न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने गौरव दीक्षितला ३० ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर एनसीबीकडून मुंबईतील मुलुंड, खारघर, वसई, विरार, वांद्रे आणि अंधेरी भागात छापेमारी केली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT