NCP च्या कार्यकर्त्याकडून Pune ग्रामीणमधल्या महिला सरपंचाला मारहाण, चित्रा वाघ यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे ग्रामीण विभागात येणाऱ्या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर NCP च्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. या संदर्भातला एक व्हीडिओच चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

ADVERTISEMENT

काय आहे व्हीडिओत?

या व्हीडिओमध्ये एक तरूण एक महिलेला मारहाण करताना दिसतो आहे. इतर काही महिला येऊन या महिलेला बाजूला करत असल्याचंही दिसतं आहे. या महिला म्हणजे कदमवाकवस्तीच्या गौरी गायकवाड आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केली असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे चित्रा वाघ यांनी?

गृहखातं ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलिच्छ शिवीगाळ करणं, त्यांना अॅट्रोसिटीच्या धमक्या देणं, महिला सरपंचांना मारहाण याचं लायसन दिलं आहे का? हे धक्कादायक, चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे. पुण्याजवळील कदमवाकवाडी गावातल्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

याप्रकरणी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानशिलात लगावली, असा आरोप महिला सरपंचाने पोलीस तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यात तो महिलेला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यकर्त्यावर नेमकी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसेच पोलीसही नेमकी काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राचं गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून प्रश्न उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT