NCP आणि BJP कधीही एकत्र येणार नाहीत-नवाब मलिक

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष कधीही एकत्र येणार नाहीत असं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी हे भाष्य केलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर ही भेट नेमकी कशासाठी होती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष कधीही एकत्र येणार नाहीत असं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी हे भाष्य केलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर ही भेट नेमकी कशासाठी होती यावरून विविध अंदाज बांधले जाऊ लागले. राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आलं. यावेळी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नवाब मलिक यांनी हे उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे कधीही एकत्र येणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेलं राष्ट्रीयत्व आणि आमच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित असलेलं राष्ट्रीयत्व या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आम्हाला हेदेखील माहित आहे की ईडी सारख्या तपासयंत्रणाचा वापर भाजपकडून चुकीच्या पद्धतीने केला जातो आहे. मात्र आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईडीला घाबरत नाही. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत राज्याच्या घडामोडींवर काहीही चर्चा झालेली नाही.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट ही काही अचानक झालेली भेट नाही. गेल्या काही दिवसांपासूनच ही भेट ठरली होती. शऱद पवार हे नरेंद्र मोदींना सहकारी बँकांबाबत भेटणारच होते. या भेटीची काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना कल्पना आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?