अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास ! बारामतीत काकांकडून पुतण्याचं तोंडभरुन कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पुतण्या आणि राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. बारामती येथे पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता साऱ्या राज्याला माहिती झाल्याचं म्हटलं. “अजितदादांच्या कामाची पद्धत चांगली आहे, पण त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मला राज्यात […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पुतण्या आणि राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. बारामती येथे पंचायत समितीच्या इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता साऱ्या राज्याला माहिती झाल्याचं म्हटलं.
ADVERTISEMENT
“अजितदादांच्या कामाची पद्धत चांगली आहे, पण त्यांच्या कार्यपद्धतीमुळे मला राज्यात त्रास होतो. इतर जिल्ह्यांतही बारामतीसारखाच विकास करा असा आग्रह धरला जातो”, असं म्हणत शरद पवारांनी इतर नेते मंडळींनाही कानपिचक्या दिल्या. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्ता भरणेही उपस्थित होते. त्यामुळे भर कार्यक्रमात अजित पवारांचं शरद पवारांनी केलेलं कौतुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार म्हणाले, “अजित म्हणजे दर्जेदार विकास हे सूत्र आता राज्याला माहित झाले आहे कोणतेही काम हातात घेतले कि ते उत्तमपणे तडीला न्यायचा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे. पण त्यांच्या या दर्जेदार कार्यशैलीचा मला त्रास होतो, असे म्हणत राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये गेल्यानंतर त्या भागातली लोक भेटत असतात आणि विविध विकास कामांची मागणी करत असताना, बारामती सारख्या दर्जेदार कामांची अपेक्षा ठेवतात.”
हे वाचलं का?
‘मी टरबुजा म्हणणार नाही पण……’ एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका
मध्यंतरी अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्यात कटुता आल्याच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. अजित पवारांनी भाजपची साथ देत मध्यंतरी सरकार स्थापनेचा केलेला अयशस्वी प्रयत्न चांगलाच गाजला होता. परंतू हे सरकार पडल्यानंतर अजित पवारांना महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा उप-मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT