सोलापूर विद्यापीठाकडून शरद पवारांचा सन्मान, देणार डी.लिट पदवी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देण्यासाठीचा विषय सिनेट सभेत मंजूर करण्यात आला आहे. सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी हा विषय सोमवारी झालेल्या सिनेट सभेत मांडला. त्यानंतर या विषयाला सिनेट सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

ADVERTISEMENT

या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान सोहळा होणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी.लिट पदवी असणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे पहिली डि.लिट पदवी ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली होती.

त्याआधी 2014 साली सोलापूर विद्यापीठाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते. त्यानंतर आता सोलापूर विद्यापीठाची ही दुसरी डि. लिट पदवी ज्येष्ठ नेते आणि पद्मविभूषण शरद पवार यांना देण्यासाठीची प्राथमिक मंजुरी सिनेट सभेत देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT