ठाकरे-शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरू, अजितदादांनी दोन्ही गटांना दिला महत्त्वाचा सल्ला.. म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाकरे आणि शिंदे गटाचा मेळावा सुरू झाला आहे. मान्यवरांची भाषणं दोन्हीकडच्या मैदानांमध्ये सुरू झाली आहेत. अशात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन्ही गटांना सल्ला दिला आहे. मेळावे घेत असताना आणि भाषणं होत असताना कुणीही कमरेखाली वार करू नयेत तसंच खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

दोन्ही मेळाव्यात कुणीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही, हे शाहू, फुले आंबेडकरांनी दिलेल्या विचारांना शोभणारं नाही. त्यामुळे टीका करताना दोन्ही गटांनी भान बाळगावं असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार बारामतीत

अजित पवार यांनी बारामतीतल्या कृष्ण दृष्टी रूग्णालयाचं उद्घाघटन केलं. त्यावेळी अजित पवारांनी मार्गदर्शन केलं. केमिकल युक्त अन्न प्रादुर्भाव आपल्यावर होतो आहे. फास्ट फूडकडे तरूण पिढी भर देते आहे. त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे. वर्क फ्रॉम होममुळे बैठं काम वाढलं आहे. त्यामुळे डोळ्यांचं प्रॉब्लेम वाढले आहेत. बारामतीत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज करतो आहोत असंही भाष्य अजित पवार यांनी केलं.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषणं पाहणार

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांची सभा बघणार, त्या दोघांसोबत मी काम केलं आहे. दोघांनी बोलत असताना कमरेखाली वार करू नये.. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पवार साहेब क्रिकेटचे अध्यक्ष होते. यावेळी ते कधी म्हणाले नाहीत की धोनीला घ्या. मी कब्बडी असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्यासाठी मी संघ नाही निवडत तो संघ सिलेक्टर टीम निवडते.

आज दसरा आहे मलाही असं वाटतं की सोने द्यावे. सोनं म्हणजे खरं सोनं नाही.. आपट्याची पाने.. नाहीतर लोक म्हणतील ह्याची भूक खूप वाढली आहे. मी लोकांना इतका वेळ देतो, निधी आणतो तरी मला कागद देतात.. महाराष्ट्रात अस कुठं बसस्थानक बघायला मिळणार नाही असं बस स्थानक होणार आहे. ज्यांच्या जास्त जागा त्याला थोडी जागा द्यावीच लागणार आहे. विकासासाठी जागा द्यावी लागेल, असे अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT