लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं… नवाब मलिक यांचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस यांना कळलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी टीका केली होती तेव्हा चमत्कार घडला होता. हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आता 2024 लाही चमत्कार घडणार आणि आम्ही तो घडवणार असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपला आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत नवाब मलिक?

हे वाचलं का?

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी फडणवीस म्हणाले होते की शरद पवार यांचं राजकारण संपलं. मात्र चमत्कार घडला. आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की 2024 लाही मोदी सरकारच येणार. आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो की सत्तेचं अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही. देवेंद्र फडणवीस यांना हे कळायला पाहिजे. जेव्हाही देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा काही ना काही चमत्कार घडतो. 2024 ला असाच चमत्कार घडणार आणि आम्ही तो घडवून आणणार.

आणखी काय म्हणाले नवाब मलिक?

ADVERTISEMENT

‘फडणवीस जेव्हा तुम्ही शाळेत होतात तेव्हा 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार सायकलवर डबलसीट संसदेत जात होते हे विसरला आहात का? असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

2019 ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. शिवसेनेला 54 जागा मिळाल्या आणि भाजपला 105 या दोघांनाही जनतेने कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षांचं भांडण चव्हाट्यावर आलं. त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला. मग उदयाला आलं ते महाविकास आघाडीचं सरकार. महाविकास आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणातला असा प्रयोग आहे जो कुणीही अपेक्षित धरला नसेल. कारण या महाविकास आघाडीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जेव्हा सुरू होता, त्यावेळी शरद पवारांचं राजकारण आता संपलं आहे त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे या आशयाची टीका देवेंंद्र फडणवीस यांनी अनेकदा केली होती. मात्र प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर चित्र बदललं आणि ते बदलण्याचं श्रेय जातं ते शरद पवार यांनाच. तोच संदर्भ घेऊन आज नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT