गडकरींचा सल्ला १०६ लावारीस ट्रोलर्सनीही अंगिकारावा – अमोल मिटकरींची जीभ घसरली
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप कार्यकर्त्यांना कोरोना काळात राजकारण न करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गडकरींच्या सल्ल्याचं कौतुक केलंय. परंतू हे कौतुक करत असताना मिटकरींनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे आणि ही टीका […]
ADVERTISEMENT
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप कार्यकर्त्यांना कोरोना काळात राजकारण न करण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गडकरींच्या सल्ल्याचं कौतुक केलंय. परंतू हे कौतुक करत असताना मिटकरींनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे आणि ही टीका करत असताना त्यांची जीभ घसरली आहे.
ADVERTISEMENT
आपल्या ट्विटर अकाऊंटवर अमोल मिटकरी यांनी भाजपच्या आमदारांचा उल्लेघ लावारीस ट्रोलर्स म्हणून केला आहे. आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला सल्ला सर्वांना अनुकरणीय आहे. मुत्सद्दी व संयमी असा हा नेता मला आवडतो. संघ विचारांशी मी कधीच सहमत नसेन, मात्र गडकरीजींसारख्या नेत्यांचा सल्ला, राज्यातील १०६ बेरोजगार, लावारीस ट्रोलर्स व त्यांच्या अंहकारी वाचाळवीरांनी सुद्धा अंगीकारावा. त्यामुळे मिटकरींच्या या प्रतिक्रीयेवर आता भाजपचे नेते काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांनी दिलेला सल्ला सर्वांना अनुकरणीय आहे. मुत्सद्दी व संयमी असा हा नेता मला आवडतो. संघविचाराशी मी कधीच सहमत नसेल. मात्र गडकरीजीसारख्या नेत्यांचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लवारीस ट्रोलर्स व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 9, 2021
काय म्हणाले होते नितीन गडकरी??
हे वाचलं का?
“तुम्ही कोरोनाची परिस्थिती जेवढी हलक्यात घेताय तेवढी ती नाहीये. आता सर्वांनी काळजी घेणं गरजेची आहे. रस्त्याची, पुलाची जी कोणती काम असतील ती घरातून करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करा. पार्टीची काम महत्वाची आहेतच…पण जीव वाचला तर पुढे काही कराल ना. महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळात राजकारण करु नका. केलेल्या प्रत्येक कामाचे बोर्ड आणि झेंडे लावण्याची गरज नाही. लोकांना ते फारसं आवडत नाही. तुम्ही जे कराल त्याचं क्रेडीट तुम्हाला मिळणारच आहे. सध्याच्या घडीला मीडिया स्ट्राँग आहे की तुमचं काम पोहचतं. पण एखादा ऑक्सिजन सिलेंडर द्यायचा आणि ४-४ वेळा त्याचे फोटो पाठवायचे असं करु नका. तुम्ही करत असलेल्या सेवाकामाची इतरांना माहिती मिळणं इथपर्यंत ठीक आहे पण त्याचा बागुलबूवा करु नका”, असं म्हणत गडकरींनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना उपदेशाचा डोस पाजला आहे.
यावेळी बोलत असताना गडकरींनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक जण भावनेच्या भरात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन काम करतात तसं करु नका. पहिले स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, त्यानंतर तुमच्या घरातली आर्थिक व्यवस्था योग्य राहिल याची काळजी घ्या आणि त्यानंतर समाजकामाला प्राधान्य द्या असं गडकरींनी सांगितलं. गेल्या काही काळात आपण अनेक कार्यकर्ते कोरोनामुळे गमावले आहेत, आता आपल्याला कार्यकर्ते गमावून चालणार नाही असं म्हणत गडकरींनी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला परिस्थितीचं भान राखून वागण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT