NCP आमदार अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आहे. रविवारी दुपारी अकोला येथील हिंगणा भागात पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत असताना मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. परंतू उपचारानंतर मिटकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आहे. रविवारी दुपारी अकोला येथील हिंगणा भागात पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत असताना मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. परंतू उपचारानंतर मिटकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा रविवारी अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या मनाची होतीया काहीली ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केली. यानंतर काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे,स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते व मित्रांना केली आहे
हे वाचलं का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अशी ओळख असलेले अमोल मिटकरी हे मुळचे अकोला जिल्ह्यातले. अनेक प्रचारसभांमधून अमोल मिटकरींनी राज्यातील विरोधकांना फैलावर घेण्याचं काम केलंय. यानंतर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेत संधी दिली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT