Pune: ‘गाड्या थेट अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर, पवारांनी अंहकारांचं दर्शन घडवलं’, भाजपकडून टिकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पुण्यातील (Pune) म्हाळुंगे बालेवाडी परिसरात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येत असून त्याच कामाचा आढावा घेण्यासाठी काल (27 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित होते. पण यावेळी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या गाड्या या थेट मुख्य स्टेडियमच्या अॅथलेटिक्ससाठी तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर नेण्यात आल्या असल्याचं समोर आलं आहे. ज्यावरुन आता भाजपच्या (BJP) नेत्यांनी शरद पवारांसह राज्यातील मंत्र्यांवर टीका सुरु केली आहे.

ADVERTISEMENT

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांवर बरीच टीका केली आहे.

‘भारतीय धावपटू ऑलिम्पिकची तयारी करत असताना ऑलम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी अंहकाराचं दर्शन घडवलं आहे. त्यांनी पुण्यातील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्पलेक्समधील ट्रॅकवर आपल्या गाड्या नेल्या, कारण त्यांना पायऱ्या चढायच्या नव्हत्या म्हणून.’ असं म्हणत अमित मालवीय यांनी पवारांवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

Man Ki Baat : Tokyo Olympic चं तिकीट मिळवलेल्या मराठमोळ्या प्रवीण जाधवच्या संघर्षाची मोदींनी घेतली दखल

दरम्यान, यावेळी शरद पवार यांच्यासह या बैठकीला राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे, क्रीडा सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त देखील उपस्थित होते. त्यामुळे अॅथलेटिक्स ट्रॅकवर एक नव्हे तर अनेक गाड्या पाहायला मिळाल्या.

ADVERTISEMENT

दुसरीकडे पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील याच मुद्द्यावर टीका केली आहे. ज्यांचे ट्विट केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रिट्विट केलं आहे.

ADVERTISEMENT

त्यामुळे आता याप्रकरणी भाजपकडून जोरदार टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

करमाळ्याचा सुयश टोकियो पॅरालिम्पिक गाजवण्यासाठी सज्ज

भाजपकडून का केली जात आहे पवारांवर टीका?

एखाद्या स्टेडियममधील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागतो. कारण हा ट्रॅक सिंथेटिक असतो. अशावेळी जर या ट्रॅकवर गाड्या धावल्यास ट्रॅकचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

एकीकडे आधीच देशात ऑलम्पिकसाठी म्हणावं त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नाही. अनेक खेळाडूंना संघर्षमय परिस्थितीला तोंड देत ऑलम्पिकपर्यंत मजल मारावी लागते. त्यातच आता टोकियो ऑलिम्पिक अगदी तोंडावर आलं आहे. अशावेळी जर अॅथलेटिक ट्रॅकचं नुकसान झालं तर त्याचा मोठा फटका हा खेळाडूंना बसू शकतो. यामुळेच भाजपकडून काल झालेल्या प्रकाराबाबत आता टीका होत आहे.

दरम्यान, याविषयी स्पोर्ट्स कॉम्पलेक्समधील अधिकाऱ्यांना जेव्हा याबाबत विचारणा केली गेली तेव्हा. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्याला माहित नसल्याचं सांगितलं. त्यामुळे या संपूर्ण सावळा गोंधळाला नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारु लागले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT