शरद पवारांशी पंगा घेतलेल्या पिचडांचं काय झालं बघा…
अहमदनगर आणि राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे 80-90 च्या दशकापासूनचे अत्यंत विश्वासार्ह सहकारी, खंदे समर्थक म्हणून पिचडांकडे पाहिलं जायचं. पिचड राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्यही होते. 2009 मध्ये शरद पवारांनी त्यांना अगदी प्रदेशाध्यक्षपदही देऊ केले. मात्र 2019 च्या ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून […]
ADVERTISEMENT

अहमदनगर आणि राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना ओळखलं जायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे 80-90 च्या दशकापासूनचे अत्यंत विश्वासार्ह सहकारी, खंदे समर्थक म्हणून पिचडांकडे पाहिलं जायचं. पिचड राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्यही होते. 2009 मध्ये शरद पवारांनी त्यांना अगदी प्रदेशाध्यक्षपदही देऊ केले.
मात्र 2019 च्या ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. त्यानंतर त्यांना सातत्याने धक्क्यावर धक्के बसतं गेले अन् आज जाहीर झालेल्या अगस्ती कारखाना निवडणूक निकालानंतर पिचड यांचं नाव राज्याच्याच काय तर अगदी स्थानिक राजकारणातूनही गायब झाल्यात जमा आहे.
अगस्तीमध्ये पिचड पिता पुत्रांचा पराभव :
आज जाहीर झालेल्या अगस्ती कारखान्याच्या निकालात मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांना पराभवाचा धक्का बसला आहे. इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटातून शेतकरी विकास मंडळचे उमेदवार वैभव पिचड यांच्यासह कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालक भाऊसाहेब खरात व अपक्ष उमेदवार प्रकाश हासे यांचा पराभव झाला आहे. या निकालानंतर पिचड यांची जवळपास २८ वर्षांची सत्ता खालसा झाली आहे.
आमदारकी गेली…
2019 मध्ये ऐन निवडणुकीत साथ सोडल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांच्यावर प्रचंड राग होता. दोघांनी पिचड पिचड पिता-पुत्रांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी पिचड यांना साथ देणाऱ्या सीताराम गायकर यांच्यावरही टीका केली होती. ‘नाही त्याचं धोतर फेडलं तर मग बघा,’ अशी एकेरी आणि वैयक्तिक टीका त्यांनी केली होती. (हेच गायकर आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत)










