शरद पवारांनी मांडली मावळची वस्तुस्थिती, म्हणाले; फडणवीसांच्या ज्ञानात पडेल भर!
मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकरी हत्याकांडाची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट जालियनवाला बागशी केली होती. ज्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना असा सवाल केला होता की, मावळ गोळीबारावेळी त्यांना जालियनवाला बाग हत्याकांड आठवलं नव्हतं? फडणवीसांच्या विचारलेल्या याच प्रश्नाला शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत […]
ADVERTISEMENT
मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकरी हत्याकांडाची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट जालियनवाला बागशी केली होती. ज्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना असा सवाल केला होता की, मावळ गोळीबारावेळी त्यांना जालियनवाला बाग हत्याकांड आठवलं नव्हतं? फडणवीसांच्या विचारलेल्या याच प्रश्नाला शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
‘मावळ गोळीबाराच्या घटनेत कोणीही राजकीय पक्ष किंवा नेते सहभागी नव्हते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यावेळी केलेली ती कारवाई होती. तसंच आता जर फडणवीस यांनी मावळची मानसिकता आता काय आहे हे समजून घेतलं तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल.’ असा टोलाही लगावला.
‘फडणवीस मावळबद्दल बोलले ते बरंच झालं…’
हे वाचलं का?
मावळमधील गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत त्यांनी सांगितलं की, ‘मावळमध्ये काय घडलं? एका दृष्टीने त्यांनी सांगितलं ते बरं केलं. कारण मावळमध्ये त्यावेळी काय घडलं हे कुणाच्या फारसं लक्षात आलं नव्हतं.’
‘मावळमध्ये जे काही झालं, म्हणजे शेतकरी मृत्यूमुखी पडले. पण जे शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांच्या मृत्यूला कोणत्याही राजकीय पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे सहकारी किंवा नेते जबाबदार नव्हते. तो आरोप होता पोलिसांवर. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांनी काही कारवाई केली. आता त्याला बराच काळ होऊन गेलाय. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्र्यांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली.’ असं पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
‘मावळमधील शेतकऱ्यांवर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गोळीबार केला नव्हता’
ADVERTISEMENT
‘आता मावळबाबतचं चित्र पूर्वीपेक्षा खूप स्पष्ट झालं आहे. मावळच्या ज्या शेतकऱ्यांचा ज्यांच्यावर पोलिसांचा गोळीबार झाला त्या काळात एक प्रकारची नाराजी ही सत्ताधाऱ्यांवर होती. आज त्याच मावळमध्ये लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली की, त्या वेळेला ज्यांच्यावर आपण आरोप केले त्यांचा याच्याशी संबंध नव्हता.’
‘याउलट हातबाहेर परिस्थिती जावी यासाठी भाजपच्या स्थानिक लोकांनी प्रोत्साहित केलं. त्या प्रोत्साहनामुळे तो संघर्ष झाला. म्हणून आज या मावळमध्ये लोक मृत्यूमुखी पडले म्हणून त्यावेळी संताप होता. आता त्या मावळमधील चित्र बदललं आहे. मावळची वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली आहे.’ असंही पवार म्हणाले.
‘मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार 90 हजार मतांनी निवडून आले’
‘मावळबाबतची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. या तालुक्यात पुणे जिल्ह्यात सातत्याने एकेकाळी जनसंघ आणि नंतरच्या काळात भाजप ही सातत्याने निवडून आली आहे. दोन-तीन वेळा सोडलं तर भाजप आणि जनसंघ हेच इथे विजय मिळवत आले आहेत. पण ज्या ज्यावेळेला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मावळचा गोळीबार ज्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्र्यांनी केला त्याच मावळमध्ये त्या गोळीबाराच्या काळामध्ये लोकांना भडकवण्याचं काम कुणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे 90 हजार मतांनी निवडून आले.’
Maharashtra Bandh: ‘जालियनवाला बाग तर पुण्यातील मावळमध्ये झालेलं’, फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
मावळ गोळीबारावरुन देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
‘ही तीच मंडळी आहेत ज्यांनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का? अशा प्रकारचं महाराष्ट्र बंद आंदोलन करायची. शेतकऱ्यांवर ज्या गोळ्या झाडल्या गेल्या ते जालियनवाला बाग होतं. म्हणून मला वाटतं की, जालियनवाला बागेची आठवण देणारे जे लोकं आहेत ते बहुदा मावळची गोष्ट विसरले आहेत.’ असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT