मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात खलबतं, काय झाली चर्चा?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (9 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमत्र्यांकडे तब्बल 2 कोटी 36 लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला आहे. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हा चेक देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (9 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी मुख्यमत्र्यांकडे तब्बल 2 कोटी 36 लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला आहे. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हा चेक देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तब्बल तासभर चर्चा देखील झाली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही भेट झाली. ज्यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला 2 कोटी 36 लाख रुपयांचा चेक
हे वाचलं का?
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शरद पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा चेक मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. याबाबतची माहिती शरद पवार यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
‘आज रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन कोटी 36 लाख रुपयांचा धनादेश मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या वर्षा निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
ADVERTISEMENT
रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिले आहे. कोरोना उपाययोजनांसाठी संस्थेचा हा खारीचा वाटा सहाय्यभूत ठरेल अशी आशा आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे लागलेला ईडी चौकशीचा ससेमिरा हा मुद्दा या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता अधिक आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी ईडी चौकशीबद्दल वक्तव्य केलं होतं.
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कंपनीवर ईडीने छापा मारला होता. ज्यावर शरद पवारांनी असं म्हटलं होतं की, ‘फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही विरोधकांना शांत बसवण्यासाठी ईडीचा वापर होतो.’
Sharad Pawar आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ED चौकशीच्या ससेमिऱ्याचा मुद्दा चर्चेसाठी येण्याची शक्यता
दुसरीकडे याच बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्य यांचाविषयी देखील चर्चा झालेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आमदारांच्या नावाची यादी गेल्या अनेक महिन्यांपूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांना दिलेली आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. याच विषयावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झालेली असू शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT