NCP, Shivsena नेते केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटले, महाराष्ट्रासाठी केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा आणि राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा अशा दोन मागण्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातल्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचं थैमानच नाही तर कहर पाहण्यास मिळाला. त्यामुळेच पुराचं संकटही ओढावलं. रायगड जिल्ह्यातील तळिये गाव तर दरडीखाली गाडलं गेलं इतकी वाईट अवस्था झाली. या गावातल्या ८० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. आधीच कोरोनाचं संकट आणि त्यानंतर आता ओढवलेली ही पुराची स्थिती या सगळ्या संकटातून वाट काढण्यासाठी राज्याला मदतीची गरज आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रावर महापुराचं संकट आलेलं असतानाही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई तातडीने देण्यासाठी चालढकल केली जात आहे. विमा कंपन्यांकडून नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना काही विचित्र अटीही घातल्या जात आहेत. विमा कंपनीचे अधिकारी पाहणीसाठी येत नाही तर तोपर्यंत व्यापाऱ्यांनी नुकसान झालेलं सामान हलवू नये असं सांगितलं जातं आहे. एवढंच नाही तर विम्याची पूर्ण नाही तर 75 टक्के रक्कमच मिळेल हेदेखील सांगितलं जातं आहे. या सगळ्या परिस्थितीची कल्पना देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भेटले.

विमा कंपन्यांनी कोणतेही निकष न लावता तातडीने 50 टक्के रक्कम ही व्यापाऱ्यांना द्यावी आणि नंतर तपासणी करून उर्वरित रक्कम द्यावी तसंच केंद्राने करायची जी मदत आहे ती तातडीने मिळावी अशा दोन प्रमुख मागण्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांनी केल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT