Navi Mumbai Airport: ‘बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं योगदान काय हे सांगायची गरज नाही’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ( Navi Mumbai international Airport) कुणाचे नाव याबाबत पुन्हा एकदा शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं विधान केलं आहे.

एकीकडे नवी मुंबईत हजारोंच्या संख्येने भूमिपूत्र आंदोलन करत असताना दुसरीकडे मात्र ‘बाळासाहेबांच्या योगदानाबद्दल सांगायची गरज नाही.’ असं वक्तव्य करुन शिवसेना अजूनही नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्यावरुन ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला असता एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. दुसरीकडे येथील स्थानिकांची मागणी आहे की, या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचेच नाव दिले जावे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

D. B. Patil: ज्यांच्या नावासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले ते दि. बा. पाटील नेमके कोण होते?

‘बाळासाहेब ठाकरेंच्या योगदानाबद्दल सांगण्याची गरज नाही’

ADVERTISEMENT

‘आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबतसोबत बैठक झाली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तीन-चार पर्याय सांगा असं सांगितलं होतं. दि. बा. पाटील यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचे योगदान कोणाला नाकारता येणार नाही. पण, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या योगदानाबद्दल देखील सांगण्याची गरज नाही. राज्यात आणि देशात त्यांच्याबद्दल जी काही भावना लोकांची आहे ती सांगण्याची गरज नाही.’ असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘दोन्ही मोठ्या व्यक्ती आहेत. सन्मानजनक आणि सर्व संमतीने प्रश्न सुटला पाहिजे ही भावना सरकारची देखील आहे. मुख्यमंत्र्यांची देखील हीच भावना आहे. दोन्ही मोठ्या व्यक्तींचा सन्मान राहिला पाहिजे अश्या पद्धतीने मार्ग निघायला हवा. अशी सरकार आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ नावाचा वाद काय? आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने कसली कंबर

नेमका वाद काय?

सुमारे 900 हेक्टर जमीन संपादित करून तब्बल सोळा हजार रुपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित निर्मिती सिडको (Cidco) व शासनामार्फत होत आहे.

या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास स्थानिकांच विरोध आहे. या विमानतळाला स्वर्गीय दि. बा.पाटील यांचे नाव देण्यात यावं अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरलं, ठाकरे सरकारचा नेमका निर्णय काय?

यासाठी 10 जून रोजी ठाणे-बेलापूर रस्त्यावर हजारो भूमिपुत्र व शहरातील नागरिकांनी मानवी साखळी अभिनव आंदोलन पुकारून तीव्र आंदोलन केलं होतं.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण केंद्रीय कृती समिती आणि नवी मुंबई शहरातील समितीने आंदोलनाची हाक दिल्यावर भूमिपुत्रांनी हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला होता.

या आंदोलनाचे पडसाद शेजारच्या रायगड ग्रामीण व ठाणे ग्रामीण भागात देखील उमटल्याने स्थानिक भूमिपुत्र या चळवळीत सहभागी झाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT