Tokyo Olympics मध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज म्हणतो, पाणीपुरी माझा जीव की प्राण !

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

८७.५८ मी. लांब भाला फेकत नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. तब्बल १३ वर्षांनी मिळालेल्या या सुवर्णपदकामुळे भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी नीरज चोप्रा गेल्या काही वर्षांपासून कठोर मेहनत घेत होता. परंतू नीरज चोप्रा हा पाणीपुरीचा चाहता आहे. ESPN ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपलं पाणीपुरीवर असणारं प्रेम बोलून दाखवलं.

ADVERTISEMENT

“माझ्यामते पाणीपुरी खाण्यात काही हरकत नाहीये. त्याच्यात बहुतांश भाग हे पाणीच असतं आणि या पाण्यामुळेच तुमचं पोट भरत. पुरी ही मोठी असते पण त्यात असणारा मैदा हा फार कमी प्रमाणात असतो. पाणीपुरी खाताना महत्वाचा भाग हा त्यामधलं पाणी असतं आणि बहुतांशवेळा या पाण्यामुळेच आपलं पोट भरतं. तुम्ही दोन पोळ्या खात असाल तर तुमच्या पोटात जेवढा मैदा किंवा गहू जातो तेवढंच पाणीपुरीचंही प्रमाण असतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज खायला हवी. परंतू अॅथलिटसाठी कधीतरी एकदा पाणीपुरी खायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं.”

Tokyo Olympics : ना सोशल मीडिया, ना फोन हातात घेतला…वाचा Neeraj ने कसं केलं स्वतःला तयार?

हे वाचलं का?

ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना नीरजला आपल्या आहाराकडेही लक्ष द्यावं लागलं होतं. आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली नीरजने डाएट प्लान तयार करुन तो कसोशीने पाळला. परंतू कधीतरी एक दिवस सूट म्हणून घरात बनवलेले पोळीचे लाडू नीरजला खूप आवडतात. इतकच नव्हे तर २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही पाणीपुरी खाऊनच नीरजने ८७.०३ मी. लांब भाला फेकला होता. नीरजने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर हरियाणातील पानीपत या त्याच्या गावात एकच जल्लोष करण्यात आला.

नीरजची आई सरोज देवी आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत असून नीरज गावात परत आला की त्याला पोळीचे लाडू (चुरमा) करून त्याला भरवणार असल्याचं सरोज देवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. नीरज ज्या प्रमाणात सराव करत होता ते पाहून तो गोल्ड मेडल जिंकेल असा मला आत्मविश्वास होता असंही नीरजच्या आईने सांगितलं. ऑलिम्पिकआधी नीरजने सहा महिने आधी एकही गोड पदार्थ खाल्ला नाही. आपलं वजन नियंत्रणात रहावं आणि सरावात खंड पडू नये यासाठी नीरजने गोड पदार्थ खाणं टाळल्याचंही त्याच्या बहिणीने सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT