पालघर : कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधांची वानवा असल्यामुळे या बालकावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होतं, मात्र आज सकाळी पाच वाजल्याच्या सुमारास या बालकाचा मृत्यू झाला. राज्यातली ही पहिलीच घटना मानली जात आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील दारशेत […]
ADVERTISEMENT
कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधांची वानवा असल्यामुळे या बालकावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होतं, मात्र आज सकाळी पाच वाजल्याच्या सुमारास या बालकाचा मृत्यू झाला. राज्यातली ही पहिलीच घटना मानली जात आहे.
ADVERTISEMENT
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील दारशेत भागात राहणाऱ्या आश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी खासगी दवाखान्यात एका बालकाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसुती झाल्यामुळे या बाळाचं वजन कमी होतं, यासाठी या बाळाला पालघरमध्येच दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यात आलं. याठिकाणी बाळाची अँटीजेन टेस्ट केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
बाळाच्या आईची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे या बाळाला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र या ठिकाणी लहान मुलांवर उपचाराची सोय नसल्यामुळे या कुटुंबाची चांगलीच फरफट झाली. अखेरीस काटेला कुटुंबाने आपल्या बाळाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवलं. मात्र जव्हार येथील रुग्णालयातही बाळावर उपचार योग्य पद्धतीने झाले नाहीत. अखेरीस त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतू आज पहाटे पाच वाजता या बाळाने उपचारादरम्यान आपला अखेरचा श्वास घेतला.
हे वाचलं का?
नवजात बाळाच्या मृत्यूमुळे काटेला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतू या निमीत्ताने पालघरसारख्या आदिवासी भागात लहान बाळांवर उपचारांची वानवा असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे याकडे सरकार कसं लक्ष देतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT