ठाणे महापालिका प्रभाग रचना : शिवसेना-राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न
राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसतो आहे. महापालिकांच्या प्रभाग रचनेमध्ये नगरसेवकांची संख्या वाढवण्यात येत असून भाजप नगरसेवकांच्या वॉर्डाची तोडफोड करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला फायदा होईल अशी रचना केली जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे. मुंबई महापालिकेनंतर सर्वात महत्वाचं स्थान असलेल्या ठाणे महापालिकेतही प्रभाग रचनेत सेना-राष्ट्रवादीने […]
ADVERTISEMENT
राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसतो आहे. महापालिकांच्या प्रभाग रचनेमध्ये नगरसेवकांची संख्या वाढवण्यात येत असून भाजप नगरसेवकांच्या वॉर्डाची तोडफोड करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला फायदा होईल अशी रचना केली जात असल्याचा आरोप होताना दिसत आहे. मुंबई महापालिकेनंतर सर्वात महत्वाचं स्थान असलेल्या ठाणे महापालिकेतही प्रभाग रचनेत सेना-राष्ट्रवादीने भाजपला खिंडीत पडकल्याचं पहायला मिळतंय.
ADVERTISEMENT
मुंब्रा, कळवा आणि दिवा या भागात वाढवण्यात आलेल्या नगरसेवकांच्या संख्येमुळे शिवसेवा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होणार असल्याचं बोललं जातयं. दुसरीकडे भाजपचा प्रभाव असलेल्या वॉर्डांमध्ये त्यांना दिलासा मिळत असल्याचं चित्र दिसत असलं तरीही इतर प्रभागांमधील बदलांमुळे भाजपला फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत.
नवीन प्रभागरचनेनुसार असं असेल नगरसेवकांचं गणित –
हे वाचलं का?
कळवा, मुंब्रा विधानसभा मतदारसंघासह दिव्यातून यापूर्वी ठाणे महानगरपालिकेत ४७ नगरसेवक निवडून गेले होते. परंतु यंदा या भागातून ५२ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. यामध्ये कळव्यात २, मुंब्य्रात २ आणि दिव्यात १ अशा पाच नवीन नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी ही जमेची बाजू म्हणावी लागणार आहे. कळवा आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व मानलं जातं.
याव्यतिरीक्त ठाणे, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडाचा अर्धा भाग असे मिळून म्हणजेच अडीच विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी पालिकेवर ८४ नगरसेवक निवडून जात होते. त्यात आता ६ नगरसेवकांची भर पडणार असून या भागातून आता ९० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत.
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी लवकरच निवडणुका, प्रभाग रचना जाहीर
ADVERTISEMENT
शिवसेनेसाठीही जमेची बाजू –
पालिकेच्या प्रभाग रचनेवर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतांचा प्रभाव दिसून आला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी शिवसेनेला अधिकची मते मिळाली होती, नेमके त्याच मतदारसंघात नवीन नगरसेवकांची संख्यादेखील वाढणार असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेसाठी ही जमेची बाजू म्हणावी लागणार आहे.
भाजपचं प्राबल्य असलेल्या वॉर्डांची तोडफोड –
एकीकडे प्रभाग रचनेत जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले बालेकिल्ले मजबूत केल्याचं चित्र पहायला मिळालं. तिकडे भाजपचं वर्चस्व असलेल्या भागांमध्ये वॉर्डांची तोडफोड केल्याचं पहायला मिळालं. नौपाडा आणि कोपरी हे भाजपचं वर्चस्व असलेले भाग वागळे इस्टेट मध्ये वाढवण्यात आले. घोडबंदर भागातील अनेक प्रभागांमध्ये अशीच रचना झाल्याचं दिसतंय.
या प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत. ज्या नागरिकांना हरकती असतील, त्यांनी आपल्या हरकती १४ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. ता. १६ फेब्रुवारी रोजी हरकती आणि सूचनांवर सुनावणीचा अंतिम तारीख २६ फेब्रुवारी आणि अंतिम विवरणपत्र निवडणूक आयोगास सादर करण्याचा अंतिम तारीख २ मार्च रोजी असणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT