सिंघू बॉर्डरवरच्या निर्घृण हत्येची जबाबदारी निहंग शिखांच्या निरवीर खालसा उदना दलाने स्वीकारली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सिंघू बॉर्डर आज पुन्हा एकदा देशाच्या पटलावर चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एका व्यक्तीची झालेली निर्घृण हत्या. या घटनेने संपूर्ण देश हादरला. तरुणाचे हात छाटून त्याच मृतदेह हा थेट बॅरिकेडला लावण्यात आला होता. तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर आंदोलनस्थळी एकच गोंधळ झाला. यावेळी पोलीस हे आंदोलकांना मुख्य मंचावर जाऊ देत नव्हते. नंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

ADVERTISEMENT

या मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. , मृत व्यक्तीचे नाव लखबीर सिंह असे आहे. लखबीर सिंह पेशाने मजूर होते आणि त्यांचे वय 35-36 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. लखबीर सिंह हा तरण-तारण जिल्ह्यातील चीमा खुर्द गावचा रहिवासी होता.

लखबीर सिंह हे आपल्या विधवा बहिणीसोबत राहत होते. त्यांची पत्नी जसप्रीत कौर ही आपल्या तीन मुलांसह वेगळी राहते. ही तीनही मुलाची वयं 8 ते 12 वर्षांच्या दरम्यान आहे. आता निहंग शिखांनी या हत्येची जबाबदारी घेतली आहे. धार्मिक ग्रंथाचा अपमान केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आहे. किसान मोर्चाने असं म्हटलं आहे की लखबीर सिंह आणि निहंग यांचा काही संबंध नाही असंही सांगितलं आहे. दरम्यान किसान मोर्चाने हेदेखील म्हटलं आहे की लखबीर सिंगला आम्ही निहंग शिखांसोबत सेवा देताना पाहिलं होतं. दुसरीकडे निहंग शिखांनी असं म्हटलं आहे लखबीर सिंगने सरबलोह ग्रंथाची बेअदबी केली त्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती देताना म्हटलं आहे की, ‘अज्ञात मारेकऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. डीसीपी हंसराज म्हणाले, ‘कुंडली, सोनीपत सीमेवर जिथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे पहाटे पाच वाजता तेथे एक मृतदेह लटकलेला आढळून आला. त्याचा हात आणि पाय कापला गेला होता. ही हत्या कुणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट नाही. अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एक व्हीडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्याची चौकशी केली जात आहे.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT