आर्यन खान सेलिब्रिटी असण्याची किंमत चुकवतो आहे का? काय म्हणत आहेत कायदेतज्ज्ञ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझ या ठिकाणी होणाऱ्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB ने अटक केली. ही कारवाई झाल्यापासून आर्यन खान तुरुंगातच आहे. गुरूवारीच अभिनेता शाहरुख खानने मुलगा आर्यनची आर्थर रोड जेल या ठिकाणी जाऊन भेट घेतली. आर्यन खानला आत्तापर्यंत तीनवेळा जामीन नाकारण्यात आला आहे. NCB ने जी कारवाई केली त्यात त्याच्याकडे ड्रग्ज आढळून आलेलं नाही. काही व्हॉट्स अॅप चॅट एनसीबीला मिळाले आहेत मात्र तो प्रथमदर्शनी पुरावा आहे. अशात आर्यन खानला जामीन का मिळत नाही असा प्रश्न आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विचारत आहेत.

ADVERTISEMENT

इंडिया टुडेसोबत या कायदेतज्ज्ञांनी चर्चा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की आर्यन खानच्या प्रकरणात अनेक गोष्टी विचित्र स्वरूपाच्या म्हणता येतील अशा आहेत ज्याची उत्तरं NCB ला द्यावी लागतील.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले अभिषेक मनू सिंघवी?

मला वाटतं की या प्रकरणात पुनर्वसनाचा, काऊन्सिलिंगचा मुद्दा याचा NCB ला विसर पडला आहे. या ड्रग्ज प्रकरणात त्यांच्या हाती मोठे मासे लागले आहेत. त्यामुळे बहुदा ते असं वागत असावेत. एनसीबी अशा प्रकारे व्यक्तीगत पातळीवर जाऊन त्रास देण्याचं काम करत असेल तर देशात अंमली पदार्थ विरोधी विभाग चांगल्याप्रकारे काम करतो आहे असं म्हणता येणार नाही. सत्र न्यायालयाने जी कोर्ट ऑर्डर दिली आहे त्यातही काही विचित्र बाग आहेत. ज्याची कायदेशीर छाननी होण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी त्याच्याजवळ ड्रग्ज सापडणं इतकं कारण पुरेसं आहे का? एखाद्याने एखाद्याशी केलेली मैत्री ही त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी आहे का? प्रश्न फक्त दोषी ठरवण्याचा नाही जामीन नाकारला जातो हा प्रकार मला चिंताजनक वाटतो. याबाबत फार काही बोलता येणार नाही कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणात असं दिसून येतं आहे की व्यक्तीगत पातळीवर ड्रग्जचा वापर करून काहीजणांना अडकवलं जातं आहे. एक व्यक्ती त्याच्या मित्रांसोबत ड्रग्ज घेतो आहे. त्याला ड्रग रॅकेट, ड्रग ट्रेडिंग मध्ये असल्याचं दाखवलं जातं आहे. तसंच त्याला एखाद्या कटाचा भाग केलं जातं आहे. मला वाटतं आहे की आर्यन खान हा सेलिब्रिटी असण्याची किंमत चुकवतो आहे.

Exclusive : आर्यन खान जामीन न मिळाल्याने प्रचंड नाराज, बराकीत गेला आणि…

आर्यन खान सेलिब्रिटी असण्याची किंमत चुकवतो आहे ? असं विचारलं असता अभिषेक मनू सिंघवी म्हणाले आत्ता जे काही सुरू आहे त्यावरून तरी हेच दिसून येतं आहे की तो सेलिब्रिटी असण्याची पुरेपूर किंमत चुकवतो आहे. आर्यन खानच्या जागी जर दुसऱ्या कुणाला पकडण्यात आलं असतं तर इथे काय पद्धतीने न्याय प्रक्रिया चालली असती? आर्यन खानला सेलिब्रिटी असल्याची किंमत नक्कीच चुकवावी लागते आहे. मात्र त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत. त्याने असमंजसपणे केलेली ही कृती आहे त्याच्यावर खटला भरण्यात यावा, त्याला शिक्षा दिली जावी मात्र तो खरंच तेवढा दोषी आहे का? हे पाहिलं गेलं पाहिजे. त्याच्याकडे ड्रग्जही आढळलेले नाहीत मग त्याला कसली शिक्षा दिली जाते आहे? असाही प्रश्न सिंघवी यांनी उपस्थित केला.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विकास पहावा यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. कोर्टाने जामीन नाकारणे हे केवळ विशेष प्रकरणांमध्ये केलं पाहिजे. जर आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतील किंवा आरोपी सराईत असेल तर जामीन नाकारणं योग्य आहे मात्र आर्यनकडे तर ड्रग्ज आढळलेले नाहीत. अशात त्याने ते सेवन केलं याचा पुरावा कसा मिळणार?

या प्रकरणात पुरावा म्हणून व्हॉट्सअॅप चॅट्सच्या वैधतेबाबतच्या प्रश्नावर पहवा म्हणाले की, व्हॉट्सअॅप चॅट्सच्या फोटोकॉपी केवळ दुय्यम पुरावा मानल्या जाऊ शकतात आणि जेव्हा दुय्यम पुरावे सादर केले जातात तेव्हा प्रत्येक दस्तऐवजासोबत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT