OBC Reservation : प्रश्न कसा सोडवाल ते सांगा सत्तेत येण्याची गरज नाही – जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपला आता सत्ताधारी पक्षानेही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. शनिवारी राज्यात भाजपने ओबीसी आरक्षणावरुन चक्काजाम आंदोलन केलं. नागपुरात आंदोलन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आमच्या हाती या आरक्षणाची सूत्रं द्या, चार महिन्यात हा प्रश्न सोडवला नाही तर राजकीय संन्यास घेईन असं वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांनी फडणवीसांचा समाचार घेतला आहे.

ADVERTISEMENT

OBC आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपच, तुमची डाळ शिजणार नाही – यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल

“ओबीसींचा इतकाच कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल ते सांगा सत्तेत येण्याची गरज नाहीये. प्रश्न कसा सोडवायचा ते आम्ही पाहून घेऊ.” जयंत पाटील नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जनतेने तुम्हाला नाकारले आहे त्यामुळे सत्तेत येण्याची गरज नाही. सत्तेत आल्याशिवाय काही करायचच नाही असं काही आहे का? ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही असंही जयंत पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

छगन भुजबळांसारख्या नेत्यांना यांच्यात काळात दोन-अडीच वर्ष तरुंगात रहावं लागलं. अनेक यातना त्यांना झाल्या. एकनाथ खडसेंसारख्या ओबीसी नेत्यांना पक्षाबाहेर पडावं लागलं अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. तीच लोकं आज रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत हे प्रचंड हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याने आजपर्यंत अशी विधानं कधीही केलेली नव्हती असं जयंत पाटील म्हणाले.

लोकांना रस्त्यावर उतरवून कोरोना घरोघरी पोहचवणं हे नेतृत्वाचं लक्षण नाही – मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

ADVERTISEMENT

सरकार मधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात भांडतात. सत्तेचे लचके तोडतात, मात्र केंद्र सरकार ला दोष देताना एक होतात असाही आरोप फडणवीस यांनी केला. एवढंच नाही तर उद्या यांना यांच्या बायकोने मारले तरीही ते मोदींनाच दोष देतील असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT