महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकणार – शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे स्थिर असून हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आसा आत्मविश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. ते आज बारामतीमधील गोविंदबाग या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

ADVERTISEMENT

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार हे ठराविक मुद्द्यांवर स्थापन झालंय. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार, जयंत पाटील या मंडळींवर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहील याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही अडचण आली की ही मंडळी एकत्र येऊन चर्चा करुन मार्ग काढतात. त्यामुळे हे सरकार स्थिर असून या सरकारला कोणताही धोका नाही असं पवारांनी स्पष्ट केलं.

दरम्यान राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेवरही आज पवारांनी भाष्य केलं. तिन्ही पक्षांची सरकारमधली भूमिका हा एक भाग आहे. राजकीय पक्ष म्हणून संघटनेचं काम करणं आणि संघटना वाढवणं हा दुसरा भाग आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपली संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे स्वाभाविक आहे. यावरुन आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं शरद पवार म्हणाले.

हे वाचलं का?

गौप्यस्फोट जरूर करा पण.. देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी दिला महत्त्वाचा सल्ला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT