भाजपविरुद्ध आघाडीचं नेतृत्व करण्यात अजिबात रस नाही – शरद पवारांची स्पष्ट भूमिका
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध आघाडीचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसने नेते शरद पवार यांनी करावं अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. परंतू शरद पवारांनी या सर्व चर्चांना आज पूर्णविराम देत या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भाजपविरुद्ध आघाडीचं नेतृत्व सध्या काँग्रेसकडे आहे. परंतू भविष्यात आपल्याला नेतृत्व करण्यात रस नसून मी भाजपविरुद्ध लढण्यासाठी पक्षांना एकत्र आणण्यासाठी मदत करेन असं […]
ADVERTISEMENT
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध आघाडीचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसने नेते शरद पवार यांनी करावं अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. परंतू शरद पवारांनी या सर्व चर्चांना आज पूर्णविराम देत या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भाजपविरुद्ध आघाडीचं नेतृत्व सध्या काँग्रेसकडे आहे. परंतू भविष्यात आपल्याला नेतृत्व करण्यात रस नसून मी भाजपविरुद्ध लढण्यासाठी पक्षांना एकत्र आणण्यासाठी मदत करेन असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
“काही दिवसांपूर्वीच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यांनी मी UPA चं नेतृत्व करावं असा ठराव संमत केला. पण मला याच्यात अजिबात रस नाहीये. मी ही जबाबदारी घेणार नाहीये. जर भाजपला पर्याय म्हणून एखादी आघाडी उभी राहत असेल तर मी त्या आघाडीला मदत आणि ती अधिक मजबूत व्हावी यासाठी नक्की प्रयत्न करेन.” शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करावं अशी मागणी केली होती.
सध्याच्या घडीला राष्ट्रीय राजकारणात शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि केंद्रात त्यांच्या शब्दाला वजन आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपची सत्ता नसलेल्या मुख्यमंत्र्यांची मोट बांधून त्याचं नेतृत्व शरद पवारांनी करावं अशी मागणी केली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवल्यानंतर केंद्रीय पातळीवरही भाजपला टक्कर देण्यासाठी अशाच प्रकारच्या आघाडीची मोट बांधायचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
हे वाचलं का?
शरद पवारांनी यावेळी बोलत असताना भविष्यात भाजपविरुद्ध आघाडी उभारत असताना काँग्रेसला वगळून चालता येणार नाही हे देखील स्पष्ट केलं. तुम्ही आता देशाच्या कोणत्याही राज्यात, जिल्ह्यात अगदी ग्रामीण पातळीवर जा…तिकडे तुम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते दिसतील. देशात काँग्रेसचं अस्तित्व अजुनही मोठ्या प्रमाणावर आहे. जर एकच पक्ष मजबुत होत राहिला तर त्या पक्षाचा नेता हा पुतीन सारखा तयार होईल. व्लादिमीर पुतीन असो किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष असोत त्यांनी मरेपर्यंत आपण देशाचं नेतृत्व करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मला आशा आहे की भारतात पुतीन तयार होणार नाही असं म्हणत पवारांनी भाजपवरही निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT