देशभरात २० गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ‘मोक्का’च्या आरोपीला कल्याणमध्ये अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण पश्चिमेकडील आंबिवली परिसरात इराणी वस्तीमध्ये अनेक चोरट्यांचा अड्डा आहे. देशभरात चेन स्नॅचिंगचे २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हसनैन सय्यद असं या आरोपीचं नाव असून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ADVERTISEMENT

कल्याण पश्चिम भागातला इराणी वस्ती हा भाग गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. पोलिसांनी अनेकदा या भागात कोम्बिंग ऑपरेशन करुन आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू प्रत्येकवेळी या भागात राहणाऱ्या स्थानिकांकडून होणाऱ्या विरोधामुळे पोलिसांना रिकाम्या हाताने परतावं लागलं आहे. पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसांचे मार्ग अडवून आरोपीला पळून जाण्यात मदत करणे असे अनेक प्रकार या भागात सर्रास होत असतात. २००८ साली एका कारवाईदरम्यान पोलिसांना स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार करावा लागला होता.

डोंबिवली : १० वर्षाच्या मुलाचा जीव गेलेली ती इमारत अनधिकृत, महापालिका इमारत पाडणार

हे वाचलं का?

मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मोक्काचा आरोपी हसनैन सय्यद या भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यावेळी डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या पथकाने कारवाईसाठी सापळा रचत इराणी वस्तीत फिल्मी स्टाईने आरोपीचा पाठलाग केला. यावेळी आरोपीला वाचवण्यासाठी काही महिलांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी हसनैनला ताब्यात घेत थेट मानपाडा पोलीस ठाणं गाठलं आहे.

हसनैन सय्यद हा देशात चैन स्नॅचिंगचा मोठा गुन्हेगार मानला जातो. आतापर्यंत एकूण २० गुन्ह्यांत तो फरार होता. कर्नाटक, सातारा, हडपसर पुणे, ठाणे, खारघर, पुणे कोथरुड, खडकपाडा, वागळे इस्टेट, भिवंडी, अंबरनाथ, रबाळे, नारपोली, नवी मुंबई आणि खांदेश्वर या शाहरंच्या पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याच्यावर मोक्काही लावण्यात आला आहे. पाच वर्षानंतर हसनैनला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २ मोबाईल, २ मोटरसायकल आणि ३० ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT