नकोसा रेकॉर्ड! देशात कोरोना वाढलेल्या 10 जिल्ह्यांपैकी 7 जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात असे १० जिल्हे आहेत जिथे कोरोना रूग्ण वाढीचं प्रमाण अधिक आहे. त्या १० जिल्ह्यांपैकी सात जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. तर कर्नाटक, छत्तीसगढ आण दिल्ली या राज्यांमधील प्रत्येकी एक जिल्हा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ही माहिती दिली. अॅक्टिव्ह रूग्णसंख्येतही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. देशातील एकूण अॅक्टिव्ह केसेसमधल्या ५८ टक्के अॅक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. देशात जी कोरोना मृत्यूंची एकूण टक्केवारी आहे त्यातले ३४ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रात होत आहेत.

ADVERTISEMENT

कोरोना लस घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

महाराष्ट्रातले कोणते सात जिल्हे सर्वाधिक कोरोना केसेस असलेले?

हे वाचलं का?

पुणे

मुंबई

ADVERTISEMENT

ठाणे

ADVERTISEMENT

नागपूर

नाशिक

औरंगाबाद

अहमदनगर

लॉकडाऊन लागलं आणि नाट्यगृहं बंद झाली तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू – भरत जाधव

आणखी काय म्हणाले राजेश भूषण?

आम्ही राज्य सरकारांना या सूचना दिल्या आहेती की राज्यांनी कोरोनाच्या RTPCR चाचण्याचं प्रमाण हे 70 टक्क्यांपर्यंत नेलं पाहिजे. महाराष्ट्रालाही या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 60 टक्के चाचण्या RTPCR पद्धतीने झाल्या. या चाचण्यांचं प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत वाढणं गरजेचं आहे असंही राजेश भूषण यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक

महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब या ठिकाणी केंद्राचं पथक येऊन पाहणी करणार आहे. महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगढमधील 11 जिल्हे तर पंजाबमधले 9 जिल्हे हे पथक पाहणार आहे. तिथे कोरोनाची वाढ का होते आहे? काय उपाय योजना करण्याची गरज आहे याचाही आढावा घेतला जाणार आहे असंही राजेश भूषण यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT