देशात ‘ओमिक्रॉन’च्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात; मुंबईसह महानगरांमध्ये ठरतोय वरचढ
देशात दररोज अडीच ते तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना परिस्थितीवर नजर ठेवणाऱ्या केंद्राच्या इन्साकॉगने (INSACOG) याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यावर असून, मुंबई-दिल्लीसह इतर महानगरांमध्ये हा व्हेरियंट अधिक वरचढ ठरू लागला आहे. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा झपाट्याने […]
ADVERTISEMENT
देशात दररोज अडीच ते तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना परिस्थितीवर नजर ठेवणाऱ्या केंद्राच्या इन्साकॉगने (INSACOG) याबद्दलची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यावर असून, मुंबई-दिल्लीसह इतर महानगरांमध्ये हा व्हेरियंट अधिक वरचढ ठरू लागला आहे. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा झपाट्याने वाढली आहे, असं निरीक्षण इन्साकॉगने (INSACOG) नोंदवलं आहे.
Covid19: लस न घेणं जीवावर बेततंय… नव्या स्टडीत आली धक्कादायक माहिती समोर
हे वाचलं का?
इन्साकॉगने १० जानेवारीच्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणंच नाहीत किंवा सौम्य स्वरूपाची आहेत. सध्याच्या लाटेत रुग्णालयात भरती कराव्या लागणाऱ्या आणि आयसीयूची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे धोक्याची पातळी अद्याप कायम आहे, असं इन्साकॉगने म्हटलं आहे.
Omicron symptom : ओमिक्रॉनचं आणखी एक त्रासदायक लक्षण आलं समोर, कानावरही होतोय परिणाम
ADVERTISEMENT
‘भारतात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरूवात झाली आहे आणि हा व्हेरियंट देशातील अनेक महानगरांमध्ये प्रबळ बनला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अलिकडेच B.1.640.2 कोरोनाशी संबंधित विषाणू दिसून आला आहे. मात्र, हा वेगाने पसरत असल्याचे वा इम्युनिटीला चकमा देत असल्याबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत,’ असंही इन्साकॉगकडून सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Covid Update : महाराष्ट्रासह पाच राज्यातील स्थिती चिंताजनक -केंद्रीय आरोग्य मंत्रालय
इन्साकॉगच्या ३ जानेवारीच्या बुलेटिनमध्येही ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं आणि मुंबई-दिल्लीत त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं म्हटलेलं होतं. यापुढच्या काळात ओमिक्रॉनचा प्रसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे नव्हे, तर देशातंर्गतच होईल. व्हेरियंट अधिक वेगाने पसरत असून, बदलल्या परिस्थितीनुसार जिनोम सिक्वेन्सिंगमधील उद्देशांवर इन्साकॉगकडून काम केलं जात असल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT