धक्कादायक ! Omicron ची लागण झालेल्या डोंबिवलीच्या रुग्णाने Covid लसीचा डोस घेतला नसल्याचं उघड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट पहिला रुग्ण सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. परंतू या रुग्णाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

या रुग्णाने आतापर्यंत कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचं लसीकरण करवून घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

२४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला, इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत.

हे वाचलं का?

याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत . या शिवाय आणखी निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे . विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT