ऋषि कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषि कपूर यांचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. आज त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. तर आजच्या दिवशी अभिनेत्री नीतू कपूरने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नीतू यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

ADVERTISEMENT

नीतूने इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत नीतू लिहीतात, “गेल्या वर्षभरात, जगात दुःखाचं वातावरण होतं. आणि आमच्यासाठी जास्त कारण आम्ही त्यांना गमावलंय. असा एक दिवस आला नाही जेव्हा आपण त्यांना मिस केलं नाही. कारण ते आपल्या आयुष्यातील एक मोठा भाग होते.”

नीतू पुढे लिहीतात, “कधीकधी त्यांचे सल्ले आठवतात तर कधी त्यांच्या विनोदांची तसंच गोष्टींचीही आठवण येते. आम्ही वर्षभर हसतमुखाने आनंद साजरा केला कारण ते आमच्या मनामध्ये आहेत. आम्ही हे सत्य स्वीकारलं आहे की, ते असताना जसं आमचं जीवन होतं तसं आता कधीच राहणार नाहीये. परंतु आयुष्य नक्कीच पुढे जात राहील.”

हे वाचलं का?

दोन वर्ष ल्युकेमियाशी झुंज देऊन अभिनेते ऋषि कपूर यांचं निधन झालं होतं. गेल्यावर्षी म्हणजेच 30 एप्रिल 2020 रोजी देशभरात लॉकडाऊन दरम्यान असताना ऋषि कपूर अखेरचा श्वास घेतला. अशा परिस्थितीत त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी दिल्लीत असल्याने तिला वडिलांना अखेरचं भेटता आलं नव्हतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT