Osmanabad: बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना ‘खेकडा’ म्हणत शिवसैनिकांची घोषणाबाजी
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचं काय होणार? हा प्रश्न आता समोर आला आहे. अशात शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन भाषणं केली त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उल्हासनगर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं ऑफिस फोडण्यात […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचं काय होणार? हा प्रश्न आता समोर आला आहे. अशात शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन भाषणं केली त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
उल्हासनगर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं ऑफिस फोडण्यात आलं. तर तानाजी सावंत यांचंही कार्यालय फोडण्यात आलं. अशात उस्मानाबादमध्येही तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणा बाजी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी उस्मानाबाद या ठिकाणी संपर्क कार्यालयासमोर शिवसैनिकांनी हल्लाबोल करत आंदोलन केलं. त्यांच्या कार्यालयाला काळं फासलं.
तानाजी सावंत यांना गद्दार असं संबोधत खेकडा सावंत असा बोर्डही लिहिण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात रोष वाढलेला दिसून आला. तानाजी सावंत यांचा मतदार संघ असलेल्या परंडा या ठिकाणी शिवसैनिकांनी जोराद आंदोलन करण्यात आलं. चपलेले जोडेही मारण्यात आले. तसंच घोषणाबाजी करण्यात आली. उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधात एक गट तसंच त्यांच्या समर्थकांचाही गट आहे. आज सावंत यांच्या विरोधात आंदोलन होत असताना समर्थकांकडून तसंच उत्तर देण्यात आलं आहे.
उस्मानाबाद या ठिकाणी शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसैनिकांनी आमदार सावंत संपर्क कार्यालयावर हल्लाबोल करत काळं फासण्यात आलं. शिवसैनिकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं आहे. सावंत यांचा विरोध करणाऱ्यांनी खेकडा सावंत असं लिहिलं होतं ते त्यांच्या समर्थकांनी खोडून काढलं.
