Padma Awards: पद्मश्री पुरस्कार पटकवणारे ‘डोंबिवलीकर काका’ कोण?
PadmaShri Award Announced To Gajanan Mane for his social Work डोंबिवली: डोंबिवलीकर गजानन माने यांना समाजसेवेसाठी नुकताच पद्मश्री पुरस्कार (Padmashri Award) जाहीर झाला आहे. कुष्ठरोगींसाठी काम करणारे समाजसेवक अशी माने काका यांची ओळख आहे. बारा वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले तेव्हापासून आतापर्यंत सलग 32 वर्ष त्यांनी कुष्ठरोगांसाठी अविरत कार्य केलं. (Padma Shri […]
ADVERTISEMENT
PadmaShri Award Announced To Gajanan Mane for his social Work डोंबिवली: डोंबिवलीकर गजानन माने यांना समाजसेवेसाठी नुकताच पद्मश्री पुरस्कार (Padmashri Award) जाहीर झाला आहे. कुष्ठरोगींसाठी काम करणारे समाजसेवक अशी माने काका यांची ओळख आहे. बारा वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले तेव्हापासून आतापर्यंत सलग 32 वर्ष त्यांनी कुष्ठरोगांसाठी अविरत कार्य केलं. (Padma Shri Award announced to Dombivlikar kaka Mr. Gajanan Mane)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर ठाण्यातील शिवसैनिक नाराज? कारण ठरले जितेंद्र आव्हाड!
गजानन माने 60 वर्षापूर्वी डोंबिवलीत राहण्यास आले. लष्करातील सैनिकाची नोकरी पूर्ण करुन त्यांनी डोेंबिवलीत समाजकरण सुरू केले. हे कार्य करत असताना कल्याण, डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर कुष्ठ रुग्ण भिक्षा मागून उपजीविका करत असल्याचे, ऊन, पावसात बसत असल्याचे माने यांच्या निदर्शनास आले. कुष्ठ रुग्णांसाठी दवाखाना त्यांच्या भागात सुरू केला. त्यांना त्यांच्या वसाहतीत रोजगाराची साधने उपलब्ध करुन दिली. त्यांना स्वालंबनाने उभे केले तर कुष्ठरुग्ण भिक्षा मागण्यासाठी शहरातील रस्त्यांवर दिसणार नाहीत. असा विचार करुन गजानन माने यांनी हनुमाननगर कुष्ठ रुग्ण वसाहतीमध्ये सामाजिक कार्याला सुरूवात केली.
हे वाचलं का?
कल्याण-डोंबिवलीत काका म्हणून परिचित असलेले गजानन माने यांच्या गेली 32 वर्ष सुरू असलेल्या समाजकार्याची दखल सरकारने घेतली असून त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी स्थानी भारतीय सैन्य दलात तरुणांनी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन तसेच अनेक विविध उपक्रम सुरू केलेत. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माने यांच्या कुटुंबीयांनी देखील आनंद व्यक्त केलाय.
Adani: अदानींना कोट्यवधींचा फटका देणारा Hindenburg Report आहे तरी काय?
ADVERTISEMENT
डोंबिवलीत राहणारे गजानन माने हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी भारतीय नौदल सेनेमध्ये 12 वर्ष सेवा केलेली आहे. तसेच भारत पाकिस्तान सन 1971 च्या युध्दात देखील सहभाग घेतलेला आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवेचा वसा अंगीकारला. गेली 32 वर्षापासून कृष्ठरोग निर्मुलन कार्यात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. कुष्ठरोग्यांसाठी शिक्षण त्यांचा आरोग्य त्यासह त्यांना उत्पन्नाचे साधन देखील गजानन माने यांनी महापालिकेमार्फत मिळवून दिले. गजानन माने यांचे मार्गदर्शन आणि प्रयत्नांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुष्ठरोग्यांसाठी राज्यातील पहिलं रुग्णालय उभारण्यात आलं.
ADVERTISEMENT
सदर कार्य करताना महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील आवश्यकते उल्लेखनीय सहकार्य वारंवार केलेले आहे हे देखील माने आवर्जून सांगतात. 2018 पासून त्यांचे लक्ष आपल्याकडील तरुण मुला- मुलींना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा देणे हे असून, त्याकरिता विविध शाळांमधून मार्गदर्शन शिबीरे लावणे तसेच सदर बाबत कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सदर सेवा अखंडपणे त्यांनी चालू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून मुलांना स्फूर्ती मिळावी याकरिता काही मॉडेल्स आणि काही युध्द स्मारके महापालिकेच्या माध्यमातून देखील साकारण्याचा प्रयत्न करीत आहे.
तसेच महिलांना शिवणकामाच प्रशिक्षण, शासन, पालिकेच्या योजनेतून त्यांना शिवणयंत्र देखील उपलब्ध करुन दिले. घराघरात मेणबत्त्या, पणत्या, अगरबत्ती सारखे हस्त कौशल्य व्यवसाय सुरू करुन या वस्तूंना बाजारपेठ मिळून दिली. घरात या मंडळींच्या कष्टातून पैसे येऊ लागले. आपण समाधानाने राहू शकतो कुष्ठ रुग्ण मंडळींना पटू लागले, असे माने यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, स्वालंबन, रोजगाराची साधने कुष्ठ रुग्ण वसाहतीत उपलब्ध झाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT