भारतातील Corona स्थितीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भाष्य, म्हणाले…
भारतात कोरोना रूग्णसंख्या रोज वाढते आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाने कहर माजवला आहे. देशातील कोरोना रूग्णसंख्येने आत्तापर्यंत सगळे विक्रम मोडले आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारताच्या कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. एक ट्विट करून त्यांनी भारतातील कोरोना स्थितीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली […]
ADVERTISEMENT
भारतात कोरोना रूग्णसंख्या रोज वाढते आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाने कहर माजवला आहे. देशातील कोरोना रूग्णसंख्येने आत्तापर्यंत सगळे विक्रम मोडले आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारताच्या कोरोना स्थितीवर भाष्य केलं आहे. एक ट्विट करून त्यांनी भारतातील कोरोना स्थितीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत इम्रान खान?
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना मी समजू शकतो. या संकटाचा आपण सगळ्यांनी एकजुटीने सामना केला पाहिजे. कोरोनामुळे पीडित शेजारी देश आणि जगभरातील लोकांसाठी ते लवकर बरे व्हावे म्हणून आम्ही दुवा करतो आहोत. माणुसकीच्या नात्याने आपण या जागतिक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे.
हे वाचलं का?
I want to express our solidarity with the people of India as they battle a dangerous wave of COVID-19. Our prayers for a speedy recovery go to all those suffering from the pandemic in our neighbourhood & the world. We must fight this global challenge confronting humanity together
— Imran Khan (@ImranKhanPTI) April 24, 2021
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही ट्विट करून दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतीयांसोबत आम्ही आहोत असं म्हटलं आहे. तसंच आम्ही पाकिस्तानच्या नागरिकांकडून कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
देशात एकाच दिवसात 3 लाख 46 हजार 786 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. देशातली वाढती रूग्णसंख्या हे चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडतो आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 2600 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर देशातल्या अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आज घडीला 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात 19 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना मुक्त झाले आहेत.
ADVERTISEMENT
Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या वाढत्या कोरोना स्थितीवर शुक्रवारपासून बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. सध्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महाराष्ट्रात आहे. तसंच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही कोरोनाचा कहर वाढला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT