पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pakistan former pm imran khan arrested
pakistan former pm imran khan arrested
social share
google news

Imran khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानच्या इस्लामबाद कोर्ट रूम मधून इम्रान खान (imran khan)  यांना रेंजर्स कडून अटक करण्यात आली. या संबंधित फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांना पाक रेंजर्स ढकलत गाडीमध्ये बसवताना दिसत आहे. दरम्यान इम्रान खान यांना कोणत्या गुन्ह्याअंतर्गत ही अटक झाली आहे, हे जाणून घेऊयात.(pakistan former pm imran khan arrested by rangers)

ADVERTISEMENT

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार,अल कादीर ट्र्स्ट प्रकरणात इम्रान खान (imran khan) यांना इस्लामबाद हायकोर्ट बाहेर रेंजर्सद्वारे अटक करण्यात आली. इस्लामबाद हायकोर्टात इम्रान खान जामीनासाठी आले होते. या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

इम्रान खान (imran khan)  यांचे अटक वॉरंट NAB रावलपिंडीने 1 मे रोजीच काढले होते. माज आज 9 मे रोजी पाक रेंजर्सने त्यांना अटक केली.ज्यावेळेस इम्रान खान यांना नेण्यात आले होते, त्यावेळेस कोणतेही अटक वॉरंट न दाखवल्याचा आरोप पीटीयाने केला आहे. तसेच पीटीआय़ने ट्विटर अकाऊंटवर इम्रान खानच्या वकीलाचा एक व्हिडिओ शेअऱ केला आहे. या व्हिडिओत तो जखमी झाल्याचे दिसत आहे.

ADVERTISEMENT

पाकिस्तानात जाळपोळ- तोडफोड

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या अटकेनंतर इस्लामबादमध्ये अनेक ठिकाणी तोडफोड सुरु झाली आहे. इम्रान खान यांची अटक अजिबात मान्य नसल्याची भूमिका त्यांच्या पीटीआय़ पक्षातील नेत्यांनी मांडलीय. या अटकेनंतर नेत्यांनी पाकिस्तानी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे सध्या इस्लामाबादमध्ये जाळपोळ-तोडफोड सुरु आहे.

ADVERTISEMENT

पाकिस्तानी जनेतने रस्त्यावर उतरावे

इम्रान खान (imran khan) यांची अटक अजिबात मान्य नाही आहे. पीटीआयचे प्रमुख देशातील सर्वांत प्रामाणिक नेते आहेत असे पीटीआय नेता हम्माद अजहर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी पाकिस्तानी जनतेला इम्रान खान यांच्या अटकेविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT