Taliban-Panjshir : तालिबानशी लढणाऱ्या पंजशीरवर पाकिस्तानचे ड्रोन हल्ले
अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानकडून आता पंजशीर व्हॅली ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, अमरूल्लाह सालेह यांनी तालिबानविरुद्ध थोपटत लढा सुरू केला. या युद्धसंघर्षात पाकिस्ताननंही उडी घेतली असून, पंजशीरवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानातील सामंगन प्रांतातील माजी खासदार झिया अरियनजाद यांनी ही माहिती दिली आहे. अमाज न्यूज या स्थानिक माध्यमाने याबद्दलचे […]
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबानकडून आता पंजशीर व्हॅली ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, अमरूल्लाह सालेह यांनी तालिबानविरुद्ध थोपटत लढा सुरू केला. या युद्धसंघर्षात पाकिस्ताननंही उडी घेतली असून, पंजशीरवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानातील सामंगन प्रांतातील माजी खासदार झिया अरियनजाद यांनी ही माहिती दिली आहे. अमाज न्यूज या स्थानिक माध्यमाने याबद्दलचे वृत्त दिलं आहे.
अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबाननं पंजशीर घाटीवर कब्जा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबान विरुद्ध रेझिस्टन्स मुव्हमेंट ऑफ अफगाणिस्तान यांच्या युद्धसंघर्ष जुंपला आहे. मागील काही दिवसांपासून दोन्हीकडील सशस्त्र बंडखोर आमने-सामने आले आहेत.
हे वाचलं का?
तालिबान विरुद्ध पंजशीर घाटीत सुरू असलेल्या संघर्षात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानकडून तालिबानला मदत केली जात असून, आता पाकिस्तानी हवाई दलाकडून पंजशीर घाटीत ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. अफगाणिस्तानातील माजी खासदार झिया अरियनजाद यांनी ही माहिती दिली.
‘पंजशीरवर पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनच्या मदतीने हल्ले केले आहेत. यात स्मार्ट बॉम्बचा वापर करण्यात आला आहे’, झिया अरियनजाद यांनी म्हटलं आहे. तालिबानविरुद्ध संघर्ष करत असलेल्या रेझिस्टन्स मुव्हमेंट ऑफ अफगाणिस्तानला यात मोठा झटका बसला आहे. रेझिस्टन्स मुव्हमेंटचे प्रवक्ते आणि पंजशीर घाटीत तालिबानविरोधी लढ्याचं नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद याच्या अत्यंत जवळचा असलेल्या फहीम दश्ती याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT