बीड : ‘ते 32 व्या क्रमांकाचे मंत्री’; पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना डिवचलं
बीड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बहीण भाऊ पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं दिसत आहेत. वडवणीत झालेल्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना नामोल्लेख टाळत लक्ष्य केलं. नगरपंचायत निवडणुकीमुळे दोन्ही नेते जिल्ह्यात असून, बीड जिल्ह्यातील वडवणी येथे पंकजा मुंडे यांची प्रचारसभा झाली. […]
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बहीण भाऊ पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं दिसत आहेत. वडवणीत झालेल्या प्रचारसभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना नामोल्लेख टाळत लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
नगरपंचायत निवडणुकीमुळे दोन्ही नेते जिल्ह्यात असून, बीड जिल्ह्यातील वडवणी येथे पंकजा मुंडे यांची प्रचारसभा झाली. यावेळी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधला. ‘पालकमंत्री निवडणूक तोंडावर आल्यानंतर निधीच्या घोषणा करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी पैसे का दिले नाहीत? पैसे आणण्याची त्यांची ताकद नाही. ते राज्यातील 32व्या क्रमांकाचे मंत्री आहेत’, अशी टीका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली.
पाटोदा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांची नुकतीच सभा पार पडली. या प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी निधी देण्याबद्दल घोषणा केली होती. निवडणुकीच्या प्रचारसभेत धनंजय मुंडेंनी शंभर कोटींची घोषणा केली होती. पाच नगरपंचायतींसाठी पाचशे कोटी आणणार असं धनंजय मुंडे पाटोदा येथील जाहीर सभेत म्हणाले होते.
हे वाचलं का?
धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोषणे पंकजा मुंडे यांनी टीका केली. ‘पालकमंत्री बीड जिल्ह्यातील निवडणूक प्रचारात नगरपंचायतीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतात. जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींना पाचशे कोटी देणार आहेत, तर मग दोन वर्षे काय टाळ कुटत बसला होता काय? जिल्ह्याचे भले करण्याची भूमिका पालकाची असली पाहिजे. कुणाला तुरुंगामध्ये टाकायचे. कुणाचे घर बर्बाद करायचे, असले राजकारण आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही”, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी निशाणा साधला.
‘तुरुंगामध्ये घालण्याची भाषा करणाऱ्यांनी आता थोडं थांबावं. आता बीड जिल्ह्यालाही किरीट सोमय्या मिळाले आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आमचं सरकार होतं, तेव्हा मी पहिल्या चार मंत्र्यांत होते. मी काही 32व्या क्रमांकाची मंत्री नव्हते. यांचे भविष्य फार चांगले नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि यांचा कबाडा होणार आहे”, अशी तोफ पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर डागली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT