Nitin Gadkari: ‘पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे लोक अस्वस्थ आहेत’, पाहा गडकरी काय म्हणाले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन केला जात आहे. त्यामुळे व्यवसाय आणि उद्योग धंद्यांचे बरेच नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे महागाईही बरीच वाढली आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही सतत वाढत आहेत. (Petrol-Diesel Price Today) सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबून जात आहे.

याच दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हे मान्य केले आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. ते म्हणाले की, वाढत्या किंमतींमुळे लोकांनी आता इतर इंधन वापरावे.

हे वाचलं का?

नागपूरमध्ये एलएनजी फिलिंग स्टेशनचे उद्घाटन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘एलएनजी, सीएनजी आणि इथेनॉल (Ethanol) सारख्या पर्यायी इंधनांच्या वापरामुळे पेट्रोलच्या दरवाढीपासून दिलासा मिळू शकेल. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबतही लोकांमध्ये संताप वाढला आहे. ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत आणि आंदोलन करीत आहेत.’

दरम्यान, गडकरीचं हे वक्तव्य हे एख प्रकारे मोदी सरकारला घरचा आहेरच आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढ होत आहे मात्र याबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाहीए.

ADVERTISEMENT

पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचा उपयोग केल्यास प्रति लीटर 20 रुपयांची बचत होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. एलएनजीच्या आर्थिक फायद्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, पारंपारिक ट्रक इंजिनला एलएनजी इंजिनमध्ये रूपांतरित करण्याची सरासरी किंमत 10 लाख रुपये असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एका वर्षात ट्रक सुमारे 98,000 किमी प्रवास करतात. अशा प्रकारे एलएनजीमध्ये रुपांतर झाल्यानंतर 9-10 महिन्यांत प्रति वाहन 11 लाख रुपयांची बचत होईल.

ADVERTISEMENT

Petrol and Diesel Price Hike : पुन्हा महागलं पेट्रोल आणि डिझेल, मुंबईत पेट्रोल 106 रूपये लिटर

इंधनाच्या वाढत्या दराबद्दल चिंता व्यक्त करताना गडकरी म्हणाले की, ‘परदेशातून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून देशावरील ओझे वाढत आहे. आम्ही बाहेरून आठ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल व डिझेल खरेदी करत आहोत. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा ओझे पडत आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की आपली आयात कमी व्हावी आणि निर्यातीत वाढ व्हावी अशी माझी इच्छा आहे.’

गडकरी यांनी यावेळी असं म्हटलं की, पेट्रोलचे दर हे 100 रुपये प्रति लीटरहून अधिक झालं आहे. तर इथेनॉल हे ग्राहकांना केवळ 60 ते 65 रुपये लीटरमध्ये मिळू शकेल. तसेच ग्रीन इंधनामुळे प्रदूषण देखील कमी होईल.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी देखील पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, अनेक दिवसानंतर डिझेलच्या किंमतीत काहीशी घट झाली आहे. डिझेल 16 पैशांनी स्वस्त झालं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT