भीषण अपघात! दिंडीत घुसला पिकअप ट्रक; 30 वारकरी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर
कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिडींत पिकअप ट्रक घुसल्याची घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेत जवळपास 30 वारकरी जखमी झाले असून, 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती केलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पिकअप ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. कार्तिकी […]
ADVERTISEMENT
कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिडींत पिकअप ट्रक घुसल्याची घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेत जवळपास 30 वारकरी जखमी झाले असून, 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती केलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पिकअप ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
कार्तिकी एकादशीनिमित्त छोट्या ट्रॅक्टरला जोडलेल्या पालखीसह वारकऱ्यांची पायी दिंडी आळंदीकडे निघाली होती. दरम्यान, आळंदीकडे मार्गक्रमण करत असताना शनिवारी (27 नोव्हेंबर) सकाळी खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळच्या पालखी नेणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला कामशेत (कान्हे) गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पिकअप ट्रकने उडवलं.
हे वाचलं का?
पिकअप ट्रकने पाठीमागून धडक दिली. यात जवळपास 30 वारकरी जखमी झाले आहेत. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. 6 रुग्णावाहिकांच्या मदतीने जखमी वारकऱ्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी 6 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने हे वृत्त फेटाळून लावलं आहे.
जखमींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वडगाव पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT