पिंपरी-चिंचवड : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे तीन जणं अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येतो आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना, काळाबाजार करणाऱ्या लोकांचं चांगलं फावतं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये सर्व लसीकरण केंद्रांवरचा लसींचा साठा संपला, लसीकरण बंद

वाकड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून अटकेतील ३ आरोपींपैकी दोन आरोपी हे हॉस्पिटलचे कर्मचारी तर एक आरोपी हा मेडीकलमध्ये कामाला आहे. कृष्ण पाटील, निखील नेहरकर आणि शशिकांत पांचाळ अशी या आरोपींची नाव आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी २१ इंजेक्शनचा साठा जप्त केला असून ही इंजेक्शन आरोपी ४० हजारांना विकण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे वाचलं का?

सांगली : लॉकडाउन काळात क्रिकेट खेळणाऱ्या १० जणांवर कारवाई

९ मे च्या रात्री नाकाबंदीदरम्यान वाकड पोलीस ठाण्यच्या पथकाने कृष्ण आणि निखील यांना ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींची चौकशी केली असतात शशिकांत पांचाळ या मुख्य आरोपीकडे आणखी इंजेक्शनचा साठा असल्याचं पोलिसांना समजलं. यावरुन शशिकांतला ताब्यात घेऊन त्याच्या गाडीची तपासणी केली असता सीटच्या खाली १९ इंजेक्शनचा साठा पोलिसांना मिळाला.

ADVERTISEMENT

आरोपी कृष्ण हा क्रिस्टल तर निखील हा ओनेक्स हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. शशिकांत पांचाळ यांचं आयुश्री मेडीकल नावाचं दुकान आहे. हे तिन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून मूळ किमतीपेक्षा जादा दराने इंजेक्शनची विक्री करत होते असं समोर आलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT