पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची चौकशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स एचएन रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि रश्मी ठाकरे यांच्या तब्बेतीविषयी विचारणा केली. मुख्यमंत्र्यांच्या […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स एचएन रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि रश्मी ठाकरे यांच्या तब्बेतीविषयी विचारणा केली.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २३ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यानंतर रश्मी ठाकरे या होम क्वारंटाईन झाल्या होत्या. यानंतर रश्मी ठाकरेंना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रश्मी ठाकरे यांच्याआधी आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना चाचणीचे दर आता आणखी कमी.. जाणून घ्या काय आहेत नवे दर?









