पंतप्रधानांकडून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी
पोटदुखीच्या त्रासामुळे आजारी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ३१ मार्चला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. रविवारी संध्याकाळपासून शरद पवारांना पोटदुखीचा त्रास होतो. यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या ज्यात त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समजलं. शरद पवार यांच्या तब्येतीची बातमी समजताच देशातील सर्व स्तरावरील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. […]
ADVERTISEMENT
पोटदुखीच्या त्रासामुळे आजारी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ३१ मार्चला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. रविवारी संध्याकाळपासून शरद पवारांना पोटदुखीचा त्रास होतो. यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या ज्यात त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समजलं. शरद पवार यांच्या तब्येतीची बातमी समजताच देशातील सर्व स्तरावरील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांना नेमकं काय झालंय ? लतादीदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह कुणी दिल्या सदिच्छा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी केली असून यातून लवकर बरे व्हा अशा सदीच्छा कळवल्या आहेत. शरद पवारांच्या ट्विटर हँडलवरुन याबद्दल माहिती कळवण्यात आली आहे.
हे वाचलं का?
Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your good wishes for my speedy recovery!@PMOIndia
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
शरद पवार यांच्यावर सुरु असलेली Blood Thinning ची सर्व औषधं थांबवण्यात आली आहेत. ३१ मार्चला शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात एंडोस्कोपीची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. यामुळे शरद पवार यांचे पुढच्या काही दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT