काँग्रेस नसती तर? काय झालं असतं पंतप्रधानांनी यादी वाचत चालवले टीकेचे बाण
काँग्रेस पक्ष नसता तर काय झालं याचा पाढाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत वाचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. यावेळी राज्यसभेत केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नसती तर काय याची एक यादीत वाचून दाखवली आहे. 1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते […]
ADVERTISEMENT
काँग्रेस पक्ष नसता तर काय झालं याचा पाढाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत वाचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत होते. यावेळी राज्यसभेत केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नसती तर काय याची एक यादीत वाचून दाखवली आहे.
ADVERTISEMENT
1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत-मोदी
काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?
हे वाचलं का?
या सभागृहात हे म्हटलं गेलं की काँग्रेस नसती तर काय झालं असतं? इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया हेदेखील म्हटलं गेलं. मात्र मी हे सांगू इच्छितो की मी विचार करतो की काँग्रेस नसती तर काय झालं असतं? कारण महात्मा गांधी यांची इच्छा होती. काँग्रेस नसती ही महात्मा गांधींची इच्छा जर पूर्ण झाली असती तर काय झालं असतं? तर लोकशाही परिवारवादापासून मुक्त झाली असती. भारत विदेशी ऐवजी स्वदेशी संकल्पांच्या मार्गावर चालला असता. जर काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक देशाला लागला नसता. दशकानुदशके भ्रष्टाचार वाढला नसता. जर काँग्रेस नसती तर जातीवाद आणि सीमावाद यांची खाई एवढी गहिरी झाली नसती.
‘आज तर फक्त नेहरूजी, नेहरूजी.. बस मजा घ्या’, पंतप्रधान मोदी भाषणादरम्यान असं का म्हणाले?
ADVERTISEMENT
काँग्रेस नसती तर शिखांचं शिरकाण झालं नसतं. वर्षानुवर्षे पंजाब दहशतवादाच्या आगीत जळाला नसता. काँग्रेस पक्ष नसता तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावं लागलं नसतं. काँग्रेस पक्ष नसता तर मुलींना तंदूरमध्ये घालून जाळण्याच्या घटना घडल्या नसत्या. देशात सामान्य माणसाला घर, रस्ता, वीज या मूलभूत सुविधांसाठी एवढ्या वर्षांपर्यंत वाट बघावी लागली नसती. मी इथे यादी मोजत बसेन पण ती न संपणारी आहे. काँग्रेस सत्तेत असताना देशाचा विकास केला नाही. आता विरोधात असताना देशाच्या विकासात बाधा आणत आहेत. काँग्रेसला राष्ट्रवरही आपत्ती आहे. राष्ट्राची संकल्पना जर गैर संवैधिनिक आहे तर तुमच्या पार्टीचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस का ठेवलं आहे? असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीकेचे ताशेरे काँग्रेसवर झाडले. जर नवा विचार करत असाल तर पक्षाचं नाव बदला असंही त्यांनी सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?
1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत असा सणसणीत टोला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाकडे पक्षाची जबाबदारी जाते आणि परिवारवादी पक्ष होतो तेव्हा सर्वात आधी टॅलेंटची हत्या होते असंही मोदींनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना काँग्रेसवर नरेंद्र मोदींनी एकामागोमाग एक प्रहार केला आहे. त्यामुळे राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT