त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे शंभर कोटी डोस; मोदींनी केलं देशवासीयांचं अभिनंदन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज शंभर कोटी लसीचे डोस उपस्थित केल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे. भारताने १०० कोटी डोस विनामुल्य दिले आहेत. त्यामुळे जग भारताला कोरोनाच्या बाबतीत अधिक सुरक्षित समजेल आणि पूर्ण जग भारताची ही ताकद बघत आहे’, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचं कौतुक केलं.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. गेल्या 19 महिन्यातील पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दहाव्यादा संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशानं 100 कोटी डोसचा टप्पा गाठल्याबद्दल अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह देशवासीयांचं अभिनंदन केलं.

‘भारताने कर्तव्याचं पालन करताना मोठं उद्धिष्ट पूर्ण केलं आहे. भारताना १०० कोटी डोसचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. या यशात १३० कोटी लोकांचं योगदान आहे. त्यामुळे हे यश भारताची आणि प्रत्येक भारतीयाचं आहे. १०० कोटी डोस ही केवळ संख्या नाही, तर देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहे.’

हे वाचलं का?

‘आज अनेक लोक भारताच्या लसीकरणाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहे. भारताने ज्या वेगाने १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला, त्याबद्दल कौतुक होतंय. पण, सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आपण सुरुवात कोठून केली. भारत आधी इतर देशांवर अवलंबून असायचा. ज्यावेळी कोरोनाची महामारी आली, त्यावेळी वेगवेगळे प्रश्न भारतासंदर्भात उपस्थित केले जात होते.’

‘जर कोरोना भेदभाव करत नसेल, तर लसींबद्दल भेदभाव होता कामा नये. भारतीयांनी समोर येत लस घेतली आणि भारतीय लस घेणार की नाही, याला उत्तर दिलं. लसीकरण मोहिमेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विक्रमी लसीकरण केलं. लसीकरण अभियानात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही’, असं मोदी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘भारताचं लसीकरण अभियान विज्ञानावर आधारीत आहे. लस तयार होण्यापासून ते लस देण्यापर्यंत यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे. अवाढव्य देशातील वेगवेगळ्या राज्यात वेळेत लसींचा पुरवठा करणं हे भगीरथाप्रमाणेच काम होतं. पण, संसाधन वाढवली गेली. कोविन प्लॅटफॉर्मची जगभरात चर्चा आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचं काम सोप्प केलं.’

ADVERTISEMENT

‘भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल पतमानाकंन संस्था आशावादी आहेत. देशात प्रचंड गुंतवणूक येऊ लागली आहे. मागील काही महिन्यात केल्या गेलेल्या सुधारणांचा भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्यात मोठी भूमिका बजावणार आहेत.’

‘कृषी क्षेत्राने देशाची अर्थव्यवस्था सावरली. देशात सगळ्या गोष्टी सुरळीतपणे सुरु होऊ लागल्या आहेत. आता देशात उत्सवांचा वातावरण आहे. त्यामुळे मी देशवासीयांना आवाहन करतो की, भारतीयांनी मेड इन इंडिया वस्तू घेण्यालाचा प्राधान्य द्यावं. भारतात आणि भारतीयांनी बनवलेली वस्तू खरेदी करणं हे आपल्या व्यवहाराचा भाग बनवावं लागेल’, असं मोदी म्हणाले.

‘मोठी उद्दिष्ट ठेवून करून ते साध्य करणं भारताला माहिती आहे. पण, माझं देशवासीयांना आवाहन आहे की, सर्तकता बाळगावीच लागणार आहे. जशी आपल्याला पायात बूट घालून जायची सवय लागली आहे, तशीच सवय मास्कची लावून घ्यायची आहे’, असं मोदी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT