पुणे गणेश उत्सवात शिंदे विरूद्ध ठाकरे संघर्षाच्या देखाव्याला पोलिसांचा विरोध, संमती नाकारल्याने वाद
पुण्यात गणेश उत्सवात मोठ्या उत्साहात पार पडतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर गणेश उत्सवाची मोठ्या थाटात तयारी सुरु आहे. पुण्यातील काही गणेश मंडळ हे ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे जिवंत देखावे दाखवतात. मात्र यंदा हे देखावे वादात अडकताना दिसत आहेत. यापूर्वी संगम तरुण मित्र मंडळांना अफझल खानाचा वध दाखवणाऱ्या देखाव्याला सुरवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र मोठ्या […]
ADVERTISEMENT

पुण्यात गणेश उत्सवात मोठ्या उत्साहात पार पडतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर गणेश उत्सवाची मोठ्या थाटात तयारी सुरु आहे. पुण्यातील काही गणेश मंडळ हे ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे जिवंत देखावे दाखवतात. मात्र यंदा हे देखावे वादात अडकताना दिसत आहेत. यापूर्वी संगम तरुण मित्र मंडळांना अफझल खानाचा वध दाखवणाऱ्या देखाव्याला सुरवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र मोठ्या विरोधानंतर पोलिसांना परवानगी द्यावी लागली. आता आणखी एका देखाव्यावरून वाद होताना दिसत आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा देखावा दाखवायला पोलिसांनी विरोध केला आहे.
काय आहे प्रकरण?
गणेश उत्सवाला अवघे चार दिवस उरले असताना बुधवार पेठेतील असणाऱ्या नरेंद्र मित्र मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्तां संघर्शाच्या देखावा दाखवण्यासाठी पोलिसांना परवानगी मागितली होती. मात्र देखाव्यावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी देखाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आयोजक असलेल्या गणेश मंडळाने देखील अधिक वाद न घालता देखावा रद्द केला आहे.
मूर्ती बनून तयार पण देखावा रद्द