Sharjeel Usmani ला सोडून देता आणि राणेंना पकडण्यासाठी पोलीस? हा कुठला न्याय-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बोलण्याच्या भरात कदाचित नारायण राणे बोलले असतील पण तसं वाक्य वापरणं हे त्यांच्या मनात असेल असं वाटत नाही. मुख्यमंत्रीपद हे एक महत्त्वाचं पद आहे. त्यापदाबाबत आणि मुख्यमंत्र्यांबाबत बोलत असताना संयम पाळणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव विसरतात यामुळे संताप व्यक्त होऊ शकतो. पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवून व्यक्त होऊ शकतो असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मात्र आत्ता जे काही सुरू आहे ते योग्य नाही. वासरू मारलं म्हणून गाय मारली असं जर सरकारचं धोरण असेल तर आम्ही शांत बसणार नाही. नारायण राणे यांचं ते वक्तव्य सोडलं तर भाजप त्यांच्याच मागे उभा आहे. शरजील उस्मानीसाठी सरकारने हीच ताकद दाखवली असती तर? जरा दाखवा ना त्यासंदर्भातली ताकद असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या प्रकारे पोलिसांची कारवाई सुरू आहे, ती पाहून वाटतं की शरजील उस्मानी जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा तो भारतमातेवरून वाट्टेल ते बोलतो आणि निघून जातो. मात्र नॉन कॉग्झिनेबल ऑफेन्स करणाऱ्या नारायण राणेंना पकडण्यासाठी ठिकठिकाणाहून पोलीस निघालेत हा काय प्रकार आहे? हे सरकार पोलिसांचा आणि त्यांच्या क्षमतेचा गैरवापर करतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी धमकी वगैरे कुणालाही देत नाही, पोलिसांना फक्त एवढंच सांगतो कायद्याने काम करा. बेकायदेशीर कामं करणारे कुठे आहेत? मी फार बोलत नाही त्याबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ADVERTISEMENT

भाजपच्या कार्यालयावर पोलीस संरक्षण घेऊन कुणी चाल करून येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. नारायण राणे यांच्या घराजवळ शिवसैनिक राडा घालत होते. याला काय म्हणतात? ते काय सांगतात आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत? असे आदेश मुख्यमंत्री कसे काय देऊ शकतात? जन आशीर्वाद यात्रेत खोडा घालण्याचा हा प्रयत्न आहे. नारायण राणे यांना बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आली तरीही आम्ही गप्प बसणार नाही. प्रविण दरेकर आणि आशिष शेलार ही यात्रा पूर्ण करतील असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT