Fadnavis Vs Pawar : “शरद पवारांचे स्टेटमेंट गुगली नाही, गाजराची पुंगी”

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis and Sharad Pawar are currently fighting each other over the swearing-in ceremony at the morning in 2019.
Devendra Fadnavis and Sharad Pawar are currently fighting each other over the swearing-in ceremony at the morning in 2019.
social share
google news

“शरद पवार यांचे स्टेटमेंट म्हणजे गुगली वगैरे काही नाही, ती गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असंच ते आहे”, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज केली.

पहाटचेच्या शपथविधीवरून सध्या देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात जोरदार जुंगलबंदी रंगली आहे. फडणवीसांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवारांनी मी गुगली टाकून फडणवीसांची विकेट घेतली, असं विधान केलं. त्यावर आता शेलार यांनी पलटवार केला आहे.

पवारांच्या ‘गुगली’वर आशिष शेलार काय म्हणाले?

मुंबईत माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, “शरद पवारांची ती पुंगी शिवसेनेबरोबर वाजेल की, आमच्याबरोबर येऊन वाजेल यासाठी वाजवलेली आहे. जिथे वाजली तिथे वाजवली. नाही वाजली तिथे खाऊन टाकली. याला आम्ही गुगली वगैरे मानत नाही. ही सत्तेची वखवख आहे. सत्तेसाठी काय पण हा उद्योगधंदा म्हणजे शरद पवारांची त्या काळातील वेगवेगळ्या पक्षांशी केलेली चर्चा आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Senthil Balaji : राज्यपाल मंत्र्याची हकालपट्टी करू शकतात, कायदा काय सांगतो?

“या विषयावर देवेंद्रजी बोलल्यानंतर अर्धसत्य बाहेर आलं. या विषयावर जाहीर चर्चेला आम्ही तयार आहोत. संपूर्ण सत्य समोर येईल. या गाजराच्या पुंगी वाजवण्यात त्रिफळाचीत कोण झाला असेल, तर तो उद्धवजी यांचा पक्ष आहे. ते अजूनही भुल दिल्यासारखे आहेत”, असा टोला शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हेही वाचा >> शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुहूर्त

“शरद पवारांच्या या गाजारांच्या पुंगीमुळे उद्धवजींचा पक्ष, नाव, सत्ता, हिंदुत्व, वंदनीय बाळासाहेबांचे विचार गेले. ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’ यामुळे उद्धवजी यांचा पक्ष संपला. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव किती योग्य होता, हे शरद पवार यांच्यामुळे आज कळले”, असं शेलार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

शिंदेंचा उठाव योग्य होता, हे पवारांनी स्पष्ट केलं -शेलार

“एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पहिल्या दिवसापासून हेच उद्धव ठाकरे यांना सांगत होते की, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला संपवायला चालले आहे. ते आपल्याशी डबल गेम खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवर भरोसा ठेवू नका. ते कधी बदलतील सांगता येत नाही. आज शरद पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे की, ते आमच्याशी बोलायला तयार झाले. बोलत होते; बोलले… याचा अर्थ ते शिवसेनेशी प्रामाणिक नव्हते. पहिल्याही दिवशी नव्हते आजही नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते, याचे पुरावे शरद पवार साहेबांनी आज दिले”, असा दावा शेलारांनी केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> आक्रोश अन् अश्रुंचा पूर! डोळ्यासमोर गमावली चार लेकरं; पावसाने कुटुंब केलं उद्ध्वस्त

संजय राऊत यांना चेहऱ्यावर थुंकी उडवून घ्यायची सवय

“संजय राऊत यांनी उडवलेली खिल्ली स्वपक्षाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपमानित करणारी आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारची उडवलेली खिल्ली याचा अर्थ ते महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजतात काय? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्याची खिल्ली उडवणे म्हणजे जनतेला मूर्ख समजून स्वतःचा टेंबा मिरवणे असे आहे. स्वतःचा टेंबा त्यांनी कितीही मिरवला तरी कोंबडा आरवायचा थांबणार नाही. सूर्य उगवायचा थांबणार नाही. सूर्यावर थुंकणारे स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घेतील. संजय राऊत यांना स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घ्यायची सवय आहे हे काही नवीन नाही”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT